🌟चला यंदा कैलास-मानसरोवर यात्रेला ; थेट विमान सेवेला हिरवा कंदील भारत-चीन परराष्ट्र सचिवांच्या बैठकीत निर्णय....!

 


 🌟भारत-चीनमध्ये थेट विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला🌟

हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असलेली कैलास-मानसरोवर यात्रा यंदापासून पुन्हा सुरू होणार आहे.तसेच भारत-चीनमध्ये थेट विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि चीनचे परराष्ट्र सचिव सुन विडाँग यांची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांतील संबंधावर विस्तृत चर्चा झाली. दोन्ही देशांनी आपले संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडनंतर कैलास-मानसरोवर यात्रा व दोन्ही देशांदरम्यान थेट विमान सेवा बंद होती ती आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

यंदा उन्हाळ्यात कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. भारत-चीनमध्ये डोकलाम वादानंतर ही यात्रा थांबली होती. तर २०२० मध्ये कोविड सुरू झाल्यामुळेही ही यात्रा बंद होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग हे गेल्या ऑक्टोबरमध्ये कझागमध्ये भेटले होते. तेव्हा दोन्ही देशांनी आपासातील संबंधावर चर्चा केली हे संबंध अधिक चांगले बनवण्याच्या उद्देशाने काही पावले उचलण्यावर दोन्ही देशांनी तेव्हा सहमती दर्शवली होती.

कैलास-मानसरोवर हा भाग तिबेटमध्ये आहे. चीन तिबेटवर आपला अधिकार सांगत आहे. कैलास पर्वत काश्मीरपासून भूतानपर्यंत आहे. या भागात ल्हा चू व झोंग चू या दोन ठिकाणांच्या मध्ये एक डोंगर आहे. याच डोंगरावर दोन शिखर आहेत. यातील उत्तरेकडील शिखर हे कैलास या नावाने संबोधले जाते. या शिखराचा आकार शिवलिंगासारखा आहे. उत्तराखंडच्या लिपूलेखापासून कैलास पर्वत ६५ किमी दूर आहे. हा भाग सध्या चीनमध्ये असल्याने त्यासाठी चीन सरकारची परवानगी लागते....                

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या