🌟राज्यातील सत्ताधारी महायुतल्या तीनही पक्षांशी आता चर्चेनंतरच 'इनकमिंग'....!


🌟महसूल मंत्री व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट🌟

नागपूर :- राज्यातील सत्ताधारी महायुतीत 'इनकमिंग'साठी इच्छुक नेत्यांची मोठी यादी तयार आहे मात्र यापुढे कुणालाही प्रवेश देताना सत्ताधारी महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीनही पक्षांशी आपसात चर्चा केली जाईल या चर्चेनंतरच निर्णय घेतला जाईल असे महसूल मंत्री व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, महायुतीविरोधात निवडणूक लढविणाऱ्या किंवा भाजपविरोधात बंडखोरी करणाऱ्यांना चर्चेनंतरच पक्षात घेतले जाईल. कोणाच्याही येण्याने महायुतीचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीतील इनकमिंगला तात्पुरता 'ब्रेक' लागल्याचे दिसतेय. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रस्तावित मुंबई दौऱ्यात मोठ्या प्रमाणावर 'इनकमिंग' होणार असल्याचे त्यांनी नाकारले. महायुतीच्या कोणत्याही पक्षात बाहेरच्या व्यक्तीच्या प्रवेशाने महायुती मजबूत होणार असेल तर त्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या