🌟पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव ममदापूर शिवारात वाळू तस्करी करणाऱ्या वाहन चालकाच्या वाहना समोर आला बिबट्या ?


🌟कान्हेगाव-ममदापूर शिवारात रात्रीच्या अंधारात अवैध वाळू उत्खननासह वाळूची तस्करी करणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट🌟

🌟अचानक अवतरलेल्या बिबट्यामुळे रात्रीच्या अंधारात अवैध चोरट्या वाळूचा काळाकारभार करणाऱ्या वाळू तस्कर फुकट्यांमध्ये माजली प्रचंड दहशत🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील पुर्णा नदीपात्रांवर बसलेल्या कान्हेगाव कौडगाव ममदापूर गणपूर गावांमध्ये काल मंगळवार दि.२८ जानेवारी २०२५ रोजी रात्री ०९.०० ते ०९.३० वाजेच्या सुमारास नरभक्षक हिस्र प्राणी म्हणून ओळखल्या जाणारा बिबट्या एका रात्रीच्या अंधारात अवैध चोरट्या वाळूची तस्करी करणाऱ्या टिप्पर चालकाला दिसून आल्याने एकच खळबळ माजली दरम्यान हाती आलेल्या वृत्तानुसार गणपूर-ममदापूर शिवारातून जाणाऱ्या रेल्वे पटरी शेजारील एका शेताखाड्यावरील एका गाईच्या छोट्या वासराची देखील मध्यरात्रीच्या सुमारास कोणत्यातरी अज्ञात हिंस्र पशुने शिकार केल्याचे सकाळच्या सुमारास निदर्शनास आले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शिकार झालेल्या वासराची पाहणी केली असता त्यांनी देखील बिबट्यानेच वासराची शिकार केल्याचं यावेळी सांगितल्याचे समजते.


तालुक्यातील पुर्णा नदीपात्रांवर बसलेल्या कान्हेगाव कौडगाव ममदापूर गणपूर गावांमधील ग्रामस्थ शेतकऱ्यांसह रात्री अपरात्री शासकीय गौण खनिज वाळूचे प्रचंड प्रमाणात उत्खनन करुन त्या अवैध चोरट्या वाळूची असंख्य वाहनांतून तस्करी करणाऱ्या तस्कर माफियांसह अवैध वाळू उपसा करणाऱ्या परप्रांतीय गोतखोर कामगारांमध्ये देखील प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील अधिकारी असो की पोलिस प्रशासनातील अधिकारी कोणालाही न जुमानता रात्रंदिवस पुर्णा-गोदावरी पात्रांमध्ये वाळूचे उत्खनन करुन त्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांमध्ये देखील एकट्या बिबट्याने दहशत निर्माण केल्याचे चित्र या परिसरात पाहावयास मिळत असल्याने आजपर्यंत जे महसूल प्रशासनासह पोलिस प्रशासनातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना जमले नाही ते एका बिबट्याच्या रुपातील मुक्या जनावराने करुन दाखवल्याने परिसरातील लोक 'मानसा परी जनावर बरी' असे म्हणत महसूल व पोलीस प्रशासनाची खिल्ली उडवताना पाहावयास मिळत आहेत.

दरम्यान संदर्भात सविस्तर वृत्तांत असा की तालुक्यातील पुर्णा नदीकाठावरील कान्हेगावांपासून अंदाजे एक ते दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्णा नदीपात्रालगतच्या शिवारात काल बुधवारी रात्री ०९.३० ते १०.०० वाजण्याच्या सुमारास काही अवैध वाळू तस्कर पुर्णा नदीपात्रातून अवैध चोरट्या वाळूचा उपसा करून ती वाहनात भरून घेऊन जात असताना चक्क एखादा पोलिस अधिकारी असल्यागत एका बिबट्यानेच वाट अडवली सदरील बिबट्या वाटेत शिकार करण्याच्या उद्देशानेच तयारीत बसला होता परंतु समोरील टिप्परच्या हेडलाईटच्या तिव्र प्रकाशामुळे त्याला समोरचे काही दिसेनासे झाले व तो एकाच ठिकाणी स्तब्ध होऊन बसल्याने टिप्पर मधील कामगारांनी आपल्या मोबाईल मध्ये त्याचे चित्रीकरण करीत व्हिडिओसह फोटो देखील काढले व त्यांनी तेथून काढता पाय घेतला कान्हेगावसह परिसरातील गावांमध्ये बिबट्या आल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली ग्रामस्थांनी शिवारातील असलेल्या आपापल्या आखाड्यावरील जनावरे घेऊन आपले गाव जवळ केले यावेळी आपल्या कर्तव्याचे भान राखत कान्हेगावचे पोलिस पाटील रामभाऊ मोरे यांनी गावातील मंदिराच्या लाऊड स्पिकर मधून गावातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना देखील बिबट्या गावात शिरल्याची व सतर्क राहण्याची चेतावणी देऊन जागरूक केले.
     दरम्यान संबंधित गावातील काही लोकांनी वनविभागास याची कल्पना दिल्याने वनविभागाचे अधिकारी अंगद आयनाळे हे घटनास्थळाकडे आपल्या पथकासह तातडीने रवाना झाले वनविभागाने रात्री उशिरा पर्यंत बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केल्याचे समजते प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शेत आखाड्यावर नागरिकांनी समुहाने रहावे.न घाबरता पशुधनाची काळजी घ्यावी एकट्याने सुनसान किंवा नदीपात्रालगत फिरु नये असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले दरम्यान या परिसरात बिबट्याचा वावर होत असल्याने सर्वात जास्त भिंतीचे वातावरण रात्री अपरात्री शासकीय गौण खनिज अवैध वाळू साठ्यांवर डल्ला मारणाऱ्या वाळू तस्कर महिन्यांमध्ये झाल्याचे पाहावयास मिळत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या