🌟भक्तीचा सुंगध सर्वत्र पसरवत 58 व्या निरंकारी संत समागमाची यशस्वीरीत्या सांगता🌟
🌟चिखली,शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रातील व देश विदेशातील लाखों भाविकांची उपस्थिती🌟
पिंपरी / चिखली : ‘‘जीवनाचा उद्देश केवळ भौतिक प्रगतीमध्ये नसून आत्मिक उन्नतीमध्ये निहित आहे.’’ असे उद्गार निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनीे महाराष्ट्राच्या 58 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन दिवशी लाखोंच्या संख्येने उपस्थित मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. या तीन दिवसीय संत समागमाची रविवारी रात्री विधिवतपणे यशस्वीरित्या सांगता झाली या संत समागमामध्ये महाराष्ट्रासह देश-विदेशातून लाखो लोकांनी भाग घेतला.
सतगुरु माताजी पुढे म्हणाल्या, मानवी जीवन एवढ्याचसाठी श्रेष्ठ मानले गेले आहे, की या जीवनात आत्मज्ञान प्राप्त करण्याची क्षमता आहे. परमात्मा निरकार असून या परमसत्याला जाणणे हेच मनुष्य जन्माचे परम लक्ष्य होय शेवटी, सतगुरु माताजींनी संागितले, की जीवन एक वरदान असून ते परमात्म्याशी क्षणोक्षणी संलग्न राहून जगायला हवे. क्षणोक्षणी जीवन योग्य दिशेने व्यतीत केल्याने आपल्याला आत्मिक शांती मिळू शकते आणि आम्ही अनंताच्या दिशेने अग्रेसर होऊ शकतो.
तत्पूर्वी समागमाच्या दुस-या दिवशी सतगुरु माताजींनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितले, की जीवनामध्ये ज्ञान आणि कर्म या दोहोंचा संगम गरजेचा आहे ज्यायोगे जीवन सुखमय बनू शकेल. जसे पक्ष्याला आकाशात झेप घेण्यासाठी दोन्ही पंखांची गरज असते तसेच जीवनात उंच भरारी घेण्यासाठी ज्ञान प्राप्त करुन त्यानुसार कर्म करण्याची गरज असते. ब्रह्मज्ञानी भक्त जीवनात परमात्म्याशी नाते जोडून प्रत्येक कार्य त्याच्या अनुसंधानामध्ये राहून करत असतो. खरं तर हेच भक्तीचे वास्तविक स्वरूप होय.
समागमात आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांनी आपल्या विचारांमध्ये सांगितले, की भक्ती करण्याचा हेतु हा परमात्म्याशी प्रेम जोडण्याचा असावा. या संदर्भात संतांचे जीवन आम्हाला प्रेरणादायी ठरते. कारण संत आपल्या आत्म्याचे मूळ स्वरूप जाणून जीवनाला योग्य दिशेला घेऊन जाण्याची शिकवण देतात. आपण आपली आस्था आणि श्रद्धेला सत्याकडे वळविले पाहिजे तेव्हाच परमात्म्याच्या प्रति प्रेम उत्पन्न होईल आणि ख-या अर्थाने भक्तीचा विस्तार सार्थक ठरेल.
💫समागमाची क्षणचित्रे💫
💫मानवतेच्या नावे संदेश :-
संत समागमाच्या शुभारंभ प्रसंगी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी मानवतेच्या नावे दिलेल्या आपल्या पावन संदेशामध्ये सांगितले, की मनुष्य रुपात जन्म प्राप्त केल्यानंतर दिव्य मानवीय गुणांनी युक्त होऊन आध्यात्मिकता व भौतिकता यांचे संतुलन साधत श्रेष्ठ जीवन जगावे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे सांसारिक उपलब्धिंच्या बाबतीत मानवाने खूपच प्रगती केली आहे ही कौतुकास्पद बाब आहे. तथापि, या उपलब्धींचा मानवाला ख-या अर्थाने तेव्हाच सदुपयोग होतो जेव्हा परमात्म्याची ओळख करुन आध्यात्मिकता जीवनात प्रवेश करते.
💫शोभा यात्रा :-
समागमाच्या पहिल्या दिवशी सकाळी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य आगमनाचे औचित्य साधुन श्रद्धालु भक्तांनी एका भव्य शोभायात्रेचे आयोजन केले ज्यामध्ये एका बाजुला भक्तांनी आपल्या हृदयसम्राट सतगुरुचे भावपूर्ण स्वागत केले तर दुस-या बाजुला मिशनच्या शिकवणूकीवर आधारित महाराष्ट्र तसेच भारताच्या वेगवेगळ्या संस्कृतींचे अद्भूत मिलन दर्शविणा-या चित्ररथ स्वरूप प्रस्तुतींचे सुंदर सादरीकरण केले जे प्रेक्षकांच्या आकर्षणाचे कारण ठरली.
💫सेवादल रॅली :-
निरंकारी समागमाच्या दुस-या दिवशी सकाळी एक भव्य सेवादल रॅली आयोजित करण्यात आली ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष स्वयंसेवकांनी आपापल्या खाकी व निळ्या वर्दीमध्ये सुसज्जित होऊन भाग घेतला. या रॅलीमध्ये मिशनच्या शिकवणूकीवर आधारित लघुनाटिकांचे सादरीकरण सेवादल सदस्यांकडून करण्यात आले ज्यांच्या माध्यमातून भक्तीमध्ये सेवेचे महत्व अधोरेखित करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध भागातील, जसे कोकण, मराठवाड़ा, खान्देश, चिखली , शेगांव बुलडाणा जिल्यासह विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र येथील सेवादल यूनिट्सनी या रॅलीमध्ये प्रेरणादायक प्रस्तुती सादर केल्या.
रॅलीमध्ये सेवादल बंधु-भगिनींना आपले आशीर्वाद प्रदान करताना सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की सेवादलाच्या सदस्यांनी अहंकाररहित होऊन मर्यादा व अनुशासनाचे पालन करत सेवा करत जायचे आहे. प्रत्येक सेवादल सदस्याने निरंकार परमात्माच्या सेवेला प्राथमिकता देत याच मार्गावर आपले जीवन व्यतीत करावे.
ज्ञान आणि कर्माच्या संगमानेच जीवन बनेल सुखमय समागमाच्या दुस-या दिवशी सायंकाळी सत्संग समारोहामध्ये उपस्थित विशाल जन समुदायाला आपल्या अमृतवाणीने कृतार्थ करताना सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी सांगितले, की जीवनामध्ये ज्ञान आणि कर्म या दोहोंचा संगम गरजेचा आहे ज्यायोगे जीवन सुखमय बनू शकेल. जसे पक्ष्याला आकाशात झेप घेण्यासाठी दोन्ही पंखांची गरज असते तसेच जीवनात उंच भरारी घेण्यासाठी ज्ञान प्राप्त करुन त्यानुसार कर्म करण्याची गरज असते. ब्रह्मज्ञानी भक्त जीवनात परमात्म्याशी नाते जोडून प्रत्येक कार्य त्याच्या अनुसंधानामध्ये राहून करत असतो. खरं तर हेच भक्तीचे वास्तविक स्वरूप होय.
समागमात आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांनी आपल्या विचारांमध्ये सांगितले, की भक्ती करण्याचा हेतु हा परमात्म्याशी प्रेम जोडण्याचा असावा. या संदर्भात संतांचे जीवन आम्हाला प्रेरणादायी ठरते. कारण संत आपल्या आत्म्याचे मूळ स्वरूप जाणून जीवनाला योग्य दिशेला घेऊन जाण्याची शिकवण देतात. आपण आपली आस्था आणि श्रद्धेला सत्याकडे वळविले पाहिजे तेव्हाच परमात्म्याच्या प्रति प्रेम उत्पन्न होईल आणि ख-या अर्थाने भक्तीचा विस्तार सार्थक ठरेल.
💫कवि दरबार :-
समागमाच्या तिस-या दिवशी एका बहुभाषी कवि दरबारचे आयोजन करण्यात आले ज्याचे शीर्षक होते ‘विस्तार - असीम की ओर।’ महाराष्टा व्यतिरिक्त देशाच्या विविध भागातून आलेल्या एकंदर 21 कवींनी मराठी, हिन्दी, इंग्रजी, कोंकणी, भोजपुरी आदि भाषांच्या माध्यमातून काव्य पाठ करत मिशनचा दिव्य संदेश प्रसारित केला. श्रोत्यांनी या कवि दरबाराचा भरपूर आनंद लुटण्याबरोबरच कवि सज्जनांचे कौतुक केले.
मुख्य कवि दरबारा व्यतिरिक्त समागमाच्या प्रथम दिनी बाल कवि दरबार तर दुस-या दिवशी महिला कवि दरबाराचे आयोजन केले गेले. या दोन्ही लघु कवि दरबारांमध्ये मराठी, हिन्दी व इंग्रेजी भाषांच्या माध्यमातून महिला व पुरुष बाल कवींनी काव्य पाठ केला ज्याची श्रोत्यांनी खूप प्रशंसा केली.
💫निरंकारी प्रदर्शनी :-
या समागमात ’विस्तार-असीम की ओर’ या मुख्य विषयावर आधारित निरंकारी प्रदर्शनी श्रोत्यांसाठी विशेष आर्कषणाचे केंद्र बनून राहिली. या प्रदर्शनीचे मुख्यतः दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आले होते. प्रथम भागात मिशनचा इतिहास, विचारधारा आणि सामायिक उपक्रमांच्या व्यतिरिक्त सतगुरुंनी देश व विदेशांमध्ये केलेल्या मानव कल्याण यात्रांची सचित्र माहिती देण्यात आली होती तर दुसÚया भागात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत राबविल्या जाणा-या सामाजिक कार्याची माहिती दर्शविण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण भारतात राबविला जात असलेला प्रोजेक्ट वननेस वन तसेच प्रोजेक्ट अमृत हे उल्लेखनीय होते. या शिवाय निरंकारी इंस्टिट्यूट ऑफ म्युझिक ॲन्ड आर्ट्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसले.
💫कायरोप्रॅक्टिक शिविर :-
समागमामध्ये काईरोप्रॅक्टिक थेरपी द्वारे निःशुल्क उपचार करण्याचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. ही थेरपी मुख्यत्वे पाठीच्या कण्याच्या विकारांशी निगडित आहे. या तंत्राने उपचार करणारी ऑस्ट्रेलिया, यूनायटेड किंगडम, फ्रांस, अमेरिका येथील 18 डॉक्टरांची टीम आपल्या निष्काम सेवा प्रदान करत होती. यावर्षी जवळपास 3500 लोकांनी या थेरपीद्वारे उपचाराचा लाभ घेतला.
💫निःशुल्क डिस्पेन्सरी :-
समागम स्थळावर एक 60 बेडचे हाॅस्पिटल तयार करण्यात आले होते ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत आयसीयूची सुविधाही उपलब्ध होती. या व्यतिरिक्त तीन ठिकाणी निःशुल्क होमियोपॅथी व डिस्पेन्सरींची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये वायसीएमए हाॅस्पिटल तसेच डी वाय पाटील हाॅस्पिटलने महत्वपूर्ण योगदान दिले. समागम स्थळावर 11 अॅम्ब्युलन्स तैनात होत्या. स्वास्थ्य सेवेमध्ये 282 डाॅक्टर्स तसेच जवळपास 450 सेवादल स्वयंसेवक आपल्या सेवा देत होते.
💫भव्य स्वरूपात लंगर प्रसादाचे आयोजन :-
समागमामध्ये येणा-या सर्व भाविकांसाठी निःशुल्क महाप्रसाद म्हणजेच लंगरची व्यवस्था तीन ठिकाणी करण्यात आली होती. या लंगर व्यवस्थेमध्ये 72 क्विंटल तांदूळ एकाच वेळी सिजवला जाण्याची क्षमता होती तसेच 70 हजार भाविक एकाच वेळी भोजन करु शकतील अशी व्यवस्था होती. सतगुरु प्रवचना व्यतिरिक्त 24 तास लंगर उपलब्ध होते. या व्यतिरिक्त अत्यल्प दराने अल्पोपहार, मिनरल वाॅटर व चहा-काॅफी इत्यादि उपलब्ध करुन देण्यासाठी 4 कॅन्टीन्सची व्यवस्था करण्यात आली होती.......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या