🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्थगिती🌟

* पवार कुटुंबातील वाद लवकर संपू देत, अजितदादांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ देत, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांचे विठुरायाला साकडे  ; अजितदादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरी म्हणाले, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड अडथळा ठरतायेत

* निष्ठावंत शिलेदार राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करण्याच्या तयारीत ; भाजपात जाणार की शिंदे गटात चर्चेला उधाण

*येत्या काळात महाराष्ट्रातून माओवाद हद्दपार झालेला असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, 11 माओवाद्यांचे आत्मसमर्पण 

* 76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोलीत धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा लाल परीतून प्रवास 

* एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्थगिती

* नियोजन हुकले! बारावी CBSC आणि सीईटी परीक्षांचे पेपर एकाच दिवशी! विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम ;  महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांचा निर्णय ; मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अन् सुरक्षेसाठी राबवणार तंत्रज्ञान; मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावरती बसवणार यंत्रणा; सरकारचा निर्णय

* सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम ; बीडमधील तपासाला वेग 

*कृष्णा आंधळे 2023 मधील 307 च्या गुन्ह्यात फरार तरीही बिनधास्त फिरायचा; सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून धक्कादायक माहिती  

* पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का ? न्यायाधीशांच्या प्रश्नावर वाल्मिक कराड लगेच म्हणाला 'मला पोलिसांकडून काही त्रास झाला नाही'

* वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा 

* वाल्मिक कराड शरण आले आहेत, मंत्र्यांच्या मित्रानं गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणं अयोग्य; मंत्री दत्तात्रय भरणेंकडून मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण  

*अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो : सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा

* हॉर्न वाजवल्याने मंत्री गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरला शिवीगाळ, जळगावमध्ये तुफान राडा; दुकानांची जाळपोळ*

* सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत ; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात 

* अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा ; भाविकांवर काळाचा घाला : भिषण अपघातात 4 ठार,7 जखमी 

* गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल 

* इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने आई-वडिलांना संपवलं, नागपुरातील खळबळजनक घटना 

* जुन्या वादातून भरदिवसा शीर धडावेगळं केलं छाटलेलं मुंडके अन् कुऱ्हाडीसह आरोपी सख्खे भाऊ पोलीस स्थानकात हजर ; नाशकातील घटनेने खळबळ 

* माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला रुग्णालयातून डिस्चार्ज 

* जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड,दमदार कामगिरीची अनोखी दखल

* दूर्गम भागात रिक्षा ड्रायव्हर.. किरणचं परदेशात शिक्षणाचं स्वप्न साकार, पदवीदान झाल्यावर फडकवला भारताचा तिरंगा!

* मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी

 ✍️ मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या