🌟यावेळी यादव यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे नेते व कार्यकर्ते देखील उपस्थित होते🌟
प्रयागराज : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काल प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभाग नोंदवून येथे स्नान केले.
यावेळी अखिलेश यादव प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की मी ११ वेळा पवित्र डुबकी मारली आहे. कुंभमध्ये सर्वजण कोणीही बोलवल्याशिवाय येत असतात प्रत्येकजण वैयक्तिक श्रद्धेने येथे येतात असे यादव म्हणाले यावेळी यादव यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे नेते व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.....
0 टिप्पण्या