🌟पत्रकारांच्या त्याग व समर्पणाचे ऋण समाजाने जपायला हवे - जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे


🌟पुर्णा शहरातील पत्रकार भवनात दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले🌟 


पुर्णा :- राष्ट्र व समाजासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवावृत्तीने अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांच्या त्याग व समर्पणाचे ऋण समाजाने जपायला हवे असे मत प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केले दर्पण दिनानिमित्त येथील पत्रकार भवनात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष मुजीब कुरेशी होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे, रिपाइं नेते प्रकाश कांबळे, माजी उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे, पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक मुन्तजीब खान आदी उपस्थित होते. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकार विजय बगाटे व संतोष पूरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना प्रकाश कांबळे म्हणाले, समाजाच्या वेदना जो जाणतो तो पत्रकार असतो. वाईट वृत्ती व कृतीवर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करतात. उत्तम खंदारे यांनी समाजासाठी राब राब राबणाऱ्या व स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या प्रत्रकारांसाठी आपण काय करतोत याचे आत्मपरीक्षण करावे. लोकशाही रक्षण व समाज सुधारणा अशा दोन्ही पातळ्यांवर ते काम करतात. मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांनी शासन व प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक पत्रकार करतात व चुकले तर प्रहार ही करतात. त्यातून आम्हालाही चांगले शिकायला मिळते. एकणच लोकशाहीत पत्रकार हा महत्त्वाचा घटक आहे. प्रमुख उपस्थितात पत्रकार गजानन हिवरे, मोहम्मद अनिस बाबूमिया, शहराध्यक्ष मोहन लोखंडे, राम भालेराव, सय्यद तौफीक, श्रीहरी घूले, सलिम सुहागणकर, अनिल अहिरे, विजय सोनूले, कैलास बलखंडे, शेख जफ्फर आदींचा समावेश होता. प्रास्ताविक जगदीश जोगदंड यांनी केले.  सुत्रसंचालन अमृत कऱ्हाळे यांनी केले. सतिश टाकळकर यांनी आभार मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या