🌟श्रीराम जन्मोत्सव समितीतील रामभक्तांचा जत्था प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात सेवा बजावणार🌟
पुर्णा :- पुर्णा शहरातील हिंदू धर्म कार्यात सातत्याने सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या श्रीराम जन्मोत्सव समितीत कार्यरत रामभक्तांचा जत्था आज गुरुवार दि.२३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ०२.०० वाजेच्या सुमारास उत्तर प्रदेशातील महापर्व प्रयागराज येथे १४४ वर्षानंतर आलेल्या कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या स्पेशल एक्स्प्रेसने रवाना झाला.
यावेळी श्रीराम जन्मोत्सव समितीतील रामभक्तांच्या जत्थ्यातील रामभक्तांनी जय श्रीरामच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण रेल्वे परिसर दणाणून सोडला सदरील रामभक्तांचा जत्था महाकुंभ मेळ्यात सेवाकार्य बजावणार आहे.....
0 टिप्पण्या