🌟वैदिक दिनदर्शिकेनुसार पौष महिन्याची पौर्णिमा सोमवार १३ जानेवारी रोजी पहाटे ०५: ०३ मिनिटांनी झाली सुरूवात🌟
प्रयागराज :- उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे आज सोमवार दि.१३ जानेवारी पासून महाकुंभमेळ्याला सुरूवात झाली असून सनातन हिंदू धर्मात प्रयागराज मध्ये आयोजित महाकुंभाला विशेष धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे.
प्रयागराज मध्ये गंगा,यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीचा संगम होतो त्याला त्रिवेणी संगम असे म्हणतात भारतातील उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज,उज्जैन आणि हरिद्वारसह महाराष्ट्र राज्यातील नाशिक या चार ठिकाणी महा कुंभ मेळाव्याचे आयोजन केले जाते.साधू संत आणि भक्त या पवित्र स्थानांवर होणाऱ्या महान उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. असे म्हणतात की महा कुंभाच्या वेळी त्रिवेणी घाटावर स्नान केल्याने मनुष्याला जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे आत्मा आणि शरीर दोन्ही शुद्ध होतात. पौष पौर्णिमेच्या दिवशी महा कुंभाचे पहिले शाही स्नान होणार आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार पौष महिन्याची पौर्णिमा सोमवार १३ जानेवारी रोजी पहाटे ०५: ०३ मिनिटांनी सुरूवात झाली आणि उद्या १४ जानेवारी रोजी ३: ५६ मिनिटांनी संपेल.......
0 टिप्पण्या