🌟पुर्णा तालुक्यातील कळगांवातल्या श्री सिद्धेश्वर विद्यालयातील स्नेहसंमेलनात मारामारी : पोलिस अधिकाऱ्याला केले लक्ष...!


🌟उपनिरीक्षक गजानन काठेवाड यांच्यावर लोखंडी गजाळीने केला जिवघेणा हल्ला : १६ आरोपी विरोधात गुन्हा दाखल🌟

पुर्णा (दि.२९ जानेवारी २०२५) :- पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील मौजे कळगांव येथील सिध्देश्वर नगर येथील श्री.सिध्देश्वर विद्यालयात काल दि.२८ जानेवारी २०२५ रोजी ०९.४० वाजेच्या सुमारास काही तरुणांमध्ये किरकोळ वादातून तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली यावेळी बंदोबस्तासाठी तैनात पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाड व महिला पोलीस कर्मचारी खिल्लारे यांनी मध्यस्थी करून वादविवाद मिटावण्या प्रामाणिक प्रयत्न केला परंतु यातील काही लोकांनी पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाड व महिला पोलीस कर्मचारी खिल्लारे यांनाच धक्काबुक्की करीत पोलिस उपनिरीक्षक काठेवाड यांच्या डोक्यात लोखंडी गजाळीने जिवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची भयंकर घटना घडली.


या घटनेत गंभीर जखमी झालेले ताडकळस पोलिस स्थानकातील पोलिस उपनिरीक्षक काठेवाड यांना परभणी येथील देवगिरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या घटने संदर्भात पोलिस कर्मचारी मारोती कुंडगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस स्थानकात गुरनं १९/२०२५ अंतर्गत कलम १०९,१३२,१२१(१),१२१(२)११५(२)३५१(१,२),१९४(२) भारतीय न्याय संहिता प्रमाणे एकूण १६ हल्लेखोर आरोपीं विरोधात गुन्ह्याची रितसर नोंद करण्यात आली असून या घटनेतील सहा जनांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील दहा आरोपी अद्यापही फरार असल्याचे समजते. 

दरम्यान कळगाव येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयातील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे व पोलिस हवालदार मारोती कुंडगीर व महिला पोलिस खिल्लारे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला परंतु यावेळी नमूद आरोपींनी ते पोलिस आहेत याची माहीती असतांना देखील जाणीवपूर्वक सरकारी कामात अडथळा निर्माण करीत पोलिस उपनिरीक्षक काठेवाडे यांच्या डोक्यात लोखंडी गजाळीने जिवघेणा हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले यावेळी घटनेतील हल्लेखोर आरोपींनी पोलीसांना जिवे मारुन टाकु अशा देखील धमक्या देत गंभीर जखमी झालेल्या पोलिस उपनिरीक्षक काठेवाडे यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी घेऊन जात असताना देखील अडवण्याचा अमानुष प्रकार केला त्यामुळे यातील काही आरोपींनी मागील प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग मनात ठेवून जाणीवपूर्वक त्यांच्यावर खुन्नस काढण्याचा प्रयत्न तर केला नाही ना ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या