🌟प्राचार्य भालेराव यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व सामुहिक राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली🌟
पुर्णा (दि.२७ जानेवारी २०२५) - पुर्णा तालुक्यातील आहेरवाडीतील राजर्षी शाहू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दि.२६ जानेवारी २०२५ रोजी ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक नानासाहेब भालेराव यांच्या हस्ते संविधानाचे निर्माते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य भालेराव यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सामुहिक राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस पाटील खंदारे जि.प.शाळेचे मुख्याध्यापक सुर्यवंशी आदी सह गावातील प्रतिष्ठित नागरिक महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण राजर्षी शाहू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील विविध वयोगटातील मुला मुलीचे विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेतील सर्वोत्तम विजेत्यांना मुख्याध्यापक नानासाहेब भालेराव गंगाधर सोनटक्के बबनराव पारवे बबन बगाटे एस. के. खदांरे याचां हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले. या प्रसंगी सुञसंचालन मानसी मोरे श्रुती खंदारे हिने केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.उत्तम मोरे,सुनिल पारवे,प्रकाश महाजन,देवानंद भारती,प्रा.प्रदीप कदम,प्रा.सतीश भालेराव,संदीप विश्वासराव,संत्यम खंडागळे,दत्ता गंगोञे,मारोती मुडें ,लहाने आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला........
0 टिप्पण्या