🌟पुर्णेतील पवार महाविद्यालयाच्या वतीने सेवा योजनांतर्गत मौ.आहेरवाडीत आयोजित वार्षिक शिबिरात ते म्हणाले🌟
पुर्णा (दि.२६ जानेवारी २०२५) - राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिरातून विद्यार्थ्यांना नव निर्मितीची ऊर्जा मिळते अशा शिबिरातून अनेक गुणी कलावंत घडत असतात असे प्रतिपादन पत्रकार जगदीश जोगदंड यांनी केले.
ते येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी मौजे आहेरवाडी येथे घेण्यात येत असलेल्या विशेष वार्षिक शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले या शिबिराचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हस्ते करण्यात आले.पुढे बोलताना जोगदंड म्हणाले की अशा विशेष वार्षिक शिबिरातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिस्तीमध्ये आणि संस्कारात वाढलेल्या स्वयंसेवकांना आपल्या कलागुणांना अभिव्यक्त होण्यासाठी उत्तम संधी मिळते यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासातून श्रेष्ठ कलावंत घडतो.
असा कलावंत पुढे समाजात सुसंवाद घडवून सुसंस्कृत समाजाची निर्मिती करतो असेही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार हे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये व्यक्तीमत्व विकासाला चालना मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी या शिबिरात मिळत असते म्हणून विद्यार्थ्यांनी या शिबिरातील मार्गदर्शनाचा आणि वेगवेगळ्या उपक्रमाचा फायदा घेऊन आपले जीवन यशस्वी केले पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर सूर्यवंशी यांनी मांडले.याप्रसंगी प्राचार्य डॉ विठ्ठल घुले,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ.सुरेखा भोसले , अधिसभा सदस्य प्रा.डॉ.विजय भोपाळे, ग्रामसेवक नामदेव बकान,पोलीस पाटील बालाजी मोरे , मुख्याध्यापक उमाकांत सूर्यवंशी ,शालेय समितीचे अध्यक्ष विलास मोरे , व्यंकटेश मोरे,बापुराव मोरे, दामुअण्णा मोरे, नवनाथ स्वामी,बाबुराव दाढे , मारोती खंदारे, विठ्ठल मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक परमेश्वर शिंदे यांनी केले तर आभार प्रा .डॉ. दीपमाला पाटोदे यांनी केले आहे. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक महाविद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते......
0 टिप्पण्या