🌟महाराष्ट्र राज्यात ४५ लाखांवर विद्यार्थी वाचणार ४५ लाखावर पुस्तके.....!


🌟शासनाचा 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' हा अनोखा उपक्रम🌟

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अनोख्या उपक्रमात पहिल्याच दिवशी नागपूर विभागातील जवळपास ४५० पेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करुन उत्स्फूर्त सहभाग घेतल्याची माहिती, उच्च शिक्षण विभाग नागपुरचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी दिली.

राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने १ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून आणि राज्यातील वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी या उपक्रमास सुरुवात झाली आहे.

पहिल्याच दिवशी राज्यातील ६ हजार महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभाग घेतला. महाविद्यालयांच्या सभागृह व ग्रंथालयामध्ये जवळपास ४५ लाखांवरील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पुस्तकांचे सामूहिक वाचन सुरु केले. या पंधरवाड्यात सहभागी प्रत्येक विद्यार्थी एक पुस्तक वाचून संकल्प पूर्ण करणार आहे. म्हणजेच ४५ लाखांवर पुस्तक वाचून राज्यात एक नवा विक्रम घडणार आहे. या पंधरवड्यादरम्यान विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य वाढविण्यासाठी ‘वाचन कौशल्य कार्यशाळा’,स्थानिक लेखकांना निमंत्रित करुन ‘विद्यार्थी-वाचक व लेखक’ या परिसंवादाचे आयोजन, पुस्तक परिक्षण स्पर्धा आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे....... 

✍️ मोहन चौकेकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या