🌟सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी....!


🌟वाल्मीक कराडला जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा🌟

बिड : बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले व आवादा कंपनीच्या दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणातील आरोपात एसआयटी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड यांना आज बुधवार दि.२२ जानेवारी रोजी एसआयटीकडून न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष मोक्का न्यायालयाने कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे यामुळे आता वाल्मीक कराडची बिडच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांच्या जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या कथीत आरोपाखाली एसआयटी वाल्मीक कराडला मोक्का लावून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते ही सात दिवसांची कोठडी आज बुधवार दि.२२ रोजी संपली असल्याने एसआयटीने बिडच्या विशेष मोक्का न्यायालयात व्हिसीद्वारे हजर केले तर प्राथमिक तपासात पूर्ण झाल्याने एसआयटीने कराडला न्यायालयीन कोठडीची मागणी केली. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कालच याप्रकरणी आरोपींसोबतत असलेला वाल्मिक कराडचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे आज कोर्ट काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले होते. पण न्यालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याने कराडची रवानगी आता बीड कारागृहात होणार आहे. तर जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला. यावेळी वाल्मिक कराडला स्लिप पनिया आजार असल्याने वकीलाने कोर्टाकडे सिपॅप मशीन देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या