🌟महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार जानेवारीचा हप्ता...!

 


🌟राज्यांतील ०२ कोटी ५२ लाख महिलांना झाला आतापर्यंत योजनेचा लाभ🌟

मुंबई :- महाराष्ट्र सरकारची 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना राज्यात जुलै २०२४ पासून सुरू झाली असून सदरील  'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना राज्यातील माता-भगिनींमध्ये अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या योजनेचा फायदा आतापर्यंत दोन कोटी ५२ लाख महिलांना झाला आहे. डिसेंबर २०२४ मध्ये सरकारने महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले. मात्र, जानेवारी महिना संपत असतानाही अद्याप नवीन हप्ता मिळालेला नाही, यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत या योजनेद्वारे महिलांना एकूण ९००० रुपये मिळाले आहेत. डिसेंबरमधील हप्ता मिळाल्यानंतर महिलांना अपेक्षा होती की संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने जानेवारीचा हप्ता जमा होईल. पण, अद्याप सरकारने याबाबत कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे महिलांकडून प्रश्न विचारले जात आहेत, जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार ?

महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना १५०० रुपयांच्या हप्त्याऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये याबाबत विचार केला जाईल, असे सांगितले आहे. निकषांमध्ये बसत नसलेल्या महिलांविरोधात तक्रार आल्यास कारवाई होईल, असा इशाराही सरकारने दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. जानेवारी २०२५ चा हप्ता १५०० रुपयेच असेल, कारण निधी वाढवण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असे सध्या तरी चित्र आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या