🌟सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


🌟सह्याद्री अतिथीगृहात पणन विभागाच्या शंभर दिवसांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलताना म्हणाले🌟


मुंबई : राज्यात सर्वत्र प्रतीवर्षी पणन विभागांतर्गत सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा स्पष्ट सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणन विभागाला दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.


त्यावेळी फडणवीस बोलत होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीसमृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारे ग्रो हब, मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत उभे करावेत. या ठिकाणी सर्व- सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. या ग्रो हबसाठीचा आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. पुढील वर्षापासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या