🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आठवड्यातील किमान तीन दिवस मंत्रालयात हजेरी लावण्याचे निर्देश...!


🌟खात्याची कामे गतीने पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश🌟

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदार जनतेने आपल्यावर संपूर्णपणे विश्वास दर्शवून बहुमताने सत्ता दिली आहे त्यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. खात्याची कामे गतीने पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी आठवड्यातील किमान तीन दिवस मंत्रालयात उपस्थित राहा. उर्वरित चार दिवसात मतदारसंघ व बाहेरील दौऱ्यांचे नियोजन करा अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील सर्व मंत्र्यांना दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार स्थिरस्थावर व्हायला तब्बल दीड महिना लागला आहे सर्व मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या