🌟उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात🌟
✍️ मोहन चौकेकर
चिखली : व्हॉइस ऑफ मीडिया संलग्नित चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त दिनांक 6 जानेवारी रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.
स्थानिक जाफराबाद रोडवरील एस व्ही एम अभ्यासिका येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश मेहत्रे हे होते तर ज्येष्ठ पत्रकार पत्रतपस्वी नानासाहेब पळसकर, व्हाईस ऑफ मिडीयाचे राज्य संघटक सुधीर चेके पाटील , जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पळसकर, टिव्ही जर्नलिस्ट जिल्हाध्यक्ष गोपाल तुपकर पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली अध्यक्ष भाषणामध्ये जेष्ठ पत्रकार प्रकाश मेहेत्रे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले तर पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल जोशी यांनी बुलढाणा येथे 10 जानेवारी रोजी व्हॉइस ऑफ मीडिया द्वारा आयोजित कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.या प्रसंगी व्हाॅईस ऑफ मीडिया राज्य संघटक सुधीर चेके पाटील , गोपाल तुपकर मंगेश पळसकर यांची देखील समयोजित भाषणे झाली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष युसुफ शेख यांनी तर आभार प्रदर्शन सचिव ओमप्रकाश खत्री यांनी केले
कार्यक्रमाला पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संजय भालेराव, , तंझीम हुसेन, संघटक बळीराम गुंजाळ , सहसंघटक राजु खरात, कोषाध्यक्ष विजय गोंधने, प्रसिध्दी प्रमुख आकाश डोणगांवकर यांच्यासह महेश वाधवानी, संजय खेडेकर, समाधान गाडेकर, उद्धव थुट्टे पाटील,अमोल खेकाळे, पवन लढ्ढा, विनोद खरे, पवन शिराळे, प्रफ्फुल देशमुख, काशिनाथ शेळके, शिवदास जाधव, रंगनाथ सावळे, रतन पठाडे , समीर शेख, अजय खरात, रोहित मोळवणे आदि सदस्य उपस्थित होते.......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या