🌟भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याची सूचना🌟
परभणी (दि.२८ जानेवारी २०२५) :- परभणी येथील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असणाऱ्या हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहाब रहे. (तुरतपीर बाबा दर्गा) उर्साच्या कालावधीत भाविकांना आवश्यक सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आज मंगळवार दि.२८ जानेवारी रोजी खासदार फौजिया खान,जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,जिल्हा पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी,मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी दर्ग्याला भेट देऊन परिसराची पाहणी केली.
जिल्हाधिकारी यांनी भाविकांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही यासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. ऊर्स परिसरात थाटण्यात येणाऱ्या दुकाना, रस्ते, वीज, पार्किंग, वाहतुक व्यवस्था, सी.सी.टिव्ही. अग्नीशामक पथक, स्वच्छता, आरोग्य पथक या सर्वांचे व्यवस्थापन नियोजनानुसार करावे. भाविकांना जाण्या-येण्यासाठी रस्ते रुंद ठेवावेत जेणकरुन मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करुन घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी वक्फ बोर्ड, आरोग्य, महावितरण, अग्नीशामन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या