🌟महसूल प्रशासनाचे अधिकारी प्रशांत थारकर व डिवायएसपी पाटील यांची धडक कारवाई : इंजिन बोटसह तराफाही जप्त🌟
पुर्णा (दि.१८ जानेवारी २०२५) :- पुर्णा तालुक्यातील तहसिलचे तहसिलदार माधवराव बोथिकर यांनी तहसिलदार पदाचा पदभार स्वीकारल्यापासून तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रांमध्ये अवैध वाळू तस्कर माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे निदर्शनास येत असून सदरील वाळू तस्कर माफिया सेक्शन पंप/इंजिन बोट/जेसीबी यंत्रांसह परराज्यातील कामगार टोळ्यांकडून प्रचंड प्रमाणात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून सदरील हजारों ब्रास चोरट्या वाळूचे साठे मोठमोठ्या शासकीय विकासकामांचे टेंडर घेणाऱ्या गुत्तेदार कंपन्यांना पुरवठा करीत असल्याचे उघड झाले आहे.
पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतून प्रचंड प्रमाणात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू तस्कर माफियांविरोधातील कारवाया थंडावल्याने अवैध वाळू तस्कर माफियांचा अक्षरशः नग्न तांडव सुरू असल्याचे आज शनिवार दि.१८ जानेवारी रोजी सायंकाळी ०६.४० ते ०७.०० वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाचे अधिकारी तथा गायब तहसिलदार प्रशांत थारकर व त्यांच्या सहकारी पथकाने तालुक्यातील मौजे मुंबर येथील गोदावरी नदीपात्रात धाडसी कारवाई करीत एक वाळू उपसा करणारे इंजिन बोटसह तराफा तब्यात घेण्याच्या केलेल्या कारवाई वरुन उघड झाले.
यावेळी मौजे मुंबर येथील गोदावरी नदीपात्रात पकडण्यात आलेले सदर वाळू उपसा करणारे इंजिन बोट धानोरा काळे येथे आणण्याचा प्रयत्न करूनही शक्य झाले नाही म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील यांना या संदर्भात गायब तहसिलदार प्रशांत थारकर यांच्याकडून कल्पना देण्यात आली असता ते स्वतः पालम पोलिस स्थानकाच्या पोलिस निरिक्षकांना सोबत घेऊन घटनास्थळी आले त्यानंतर एसडीओ यांच्या तोंडी आदेशाने फळा गावाच्या बाजूने काठाला आणून जिलेटीन ने नष्ट करण्यात आले आल्याचे महसूल प्रशासनाच्या सुत्रांकडून समजते सदरील कारवाई महसूल प्रशासनाचे अधिकारी नायब तहसिलदार प्रशांत थारकर व उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील पूर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विलास घोबाडे,पालम पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक श्री थोरात तलाठी श्री खिल्लारे तलाठी श्री शेलाते, पोलिस कॉन्सटेबल वाघ यांनी संयुक्तपणे केली....
0 टिप्पण्या