🌟या भूकंपाची तीव्रता २.४ रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली🌟
सातारा : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसर काल रविवार दि.०५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०६.५६ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला या भूकंपाची तीव्रता २.४ रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली.
राज्यात २०२५ या नवीन वर्षात झालेला हा पहिला भूकंप आहे या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याचे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले. कोयना धरण परिसरात रविवारी सकाळी ०६.५६ मिनिटांनी २.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य धक्क्याने कोयना धरण परिसर हादरला या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून ९ किलोमीटर अंतरावर गोषटवाडी गावच्या हद्दीत असल्याचे समजते......
0 टिप्पण्या