🌟मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह समर्थकांना पोलिसांच्या नोटीसा.....!


🌟जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस🌟

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे काल मंगळवार दि.२८ जानेवारी २०२५ रोजी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस होता परंतु आता त्यांचे आंदोलन कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण पोलिस प्रशासनाने मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांना नोटीसा बजावल्या आहे. 

यामागचं कारण आता समोर आलं आहे. उपोषणात सहभागी झालेल्या व्यक्तींची नावे,कोणत्या ठिकाणी उपोषणास कोण बसले आहे,आंदोलनकर्त्यांची माहिती दिली नाही इतकेच नाही तर त्यांचे वैद्यकीय अहवालही दिले नाही असे पोलिसांनी नोटिशीत म्हटले आहे यावर आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आजही ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, उपोषणामुळे मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. या उपोषणात मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख सहभागी झाले आहेत. उपोषण मागे घेण्यासाठी सरकार मनोज जरांगेची मनधरणी करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या