🌟लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर....!

 


🌟पुण्यातील विशेष न्यायालयाने २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन केला मंजूर🌟

पुणे : लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या सुनावणीसाठी राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधीविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या