🌟परभणी शहरातील गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेली ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरु करण्यात यावी....!


🌟सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी सेना शहराध्यक्ष अरुण पवार यांची मागणी🌟 


परभणी :- परभणी शहरातील मोठ्या प्रमाणात वाढलेली ट्रॅफिक लक्षात घेता ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरु करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी सेना शहराध्यक्ष अरुण पवार यांनी केली आहे.

परभणी शहरातील मोठ्या प्रमाणात वाढलेली ट्रॅफिक व त्यातच उडाणटप्पू मोटारसायकल चालकांकडून भरधाव वेगाने मोटारसायकली पळवल्या जात असल्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांसह अबालवृद्ध महिला व शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींना आपला जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत असल्याने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने शहरातील ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरु करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे असेही सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी सेना शहराध्यक्ष अरुण पवार यांनी म्हटले आहे पुढे बोलताना ते म्हणाले की सर्वसामान्य गोर-गरीब वाहन चालकांना कारवाईचा बडगा दाखवून नाहक त्रास देणारे परभणी ट्रॅफिक पोलीस हे संपूर्णतः कुचकामी झाल्याचे पाहावयास मिळत असून मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या वसमत रोडवर दररोज दोन ते तीन अपघात होतात परंतु सुसाट वेगाने दुचाकी वाहन पळविणाऱ्या उडाणटप्पू टुकारांना सोडून सर्वसामान्य गोरगरीब वाहन चालकांचे फोटो काढून दंड आकारणारे परभणी ट्रॅफिक पोलिस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ही बाब निश्चितच निषेधार्ह असून परभणी जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासनाने ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरु करावी असेही अरुण पवार यांचे म्हणणे आहे......

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या