🌟पुर्णेतील राष्ट्रीयकृत महाराष्ट्र बँकेत बेजबाबदार 'कच्छवेशाही' ? असमाधानी बँक ग्राहक/खातेदारांची ओरड ठायीं ठायीं....!


🌟बँकेतील एटीएम सुविधा अदृश्य ? सुरक्षा रक्षक बेपत्ता अन् बँक ग्राहकांच्या सुरक्षेला देखील कोणी वाली नाही ?🌟


(
महाराष्ट्र बँक प्रशासनाने एटीएम सुविधा केंद्रासाठी मागील पाच महिन्यांपासून भाडेकरार केलेली ही जागा भाडेही सुरू : एटीएम सुविधा केंद्र कार्यान्वित करण्याचा मुहूर्त मात्र ठरेणा)

पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा शहरातील राष्ट्रीयकृत महाराष्ट्र बँकेत बेजबाबदार 'कच्छवेशाही' असमाधानी बँक ग्राहक/खातेदारांची ओरड ठायीं ठायीं‌....बँकेतील एटीएम सुविधा अदृश्य ? सुरक्षा रक्षकाना बेपत्ता बँक ग्राहकांच्या सुरक्षेला देखील कोणी वाली नाही ? अशी एकंदर अवस्था महाराष्ट्र बँकेची झाली असल्यामुळे महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार करणारे असंख्य व्यापारी/उद्योजक,शासकीय अधिकारी/नौकरदार,पेन्शनधारक विविध शासकीय योजनांतील लाभार्थी बँकेतील बेजबाबदार 'कच्छवेशाहीला' कर्जदार अक्षरशः त्रस्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

पुर्णा तालुक्यात सर्वात मोठ्या आर्थिक उलाढालीत अग्रेसर असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांतील भारतीय स्टेट बँकेच्या पाठोपाठ द्वितीय क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र बँकेतील शाखाधिकारी पदाचा पदभार चंद्रकांत कच्छवे यांनी सांभाळल्या पासून महाराष्ट्र बँकेत दलालांसह चोरट्यांचा देखील अगदी मुक्तसंचार होत असल्याचे पाहावयास मिळत असून महाराष्ट्र बँकेत मागील दोन/तीन वर्षांपासून सुरक्षारक्षक नसल्याने बँकेत उमडणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी बँक खातेदार/ग्राहकांकडील रक्कम पळवल्याच्या तीन घटना बँकेत घडल्या असून महाराष्ट्र बँकेच्या शाखेत उमडलेल्या गर्दीचा फायदा घेऊन बँकेतल्या खात्यावरील रक्कम काढण्यास आलेल्या बॅंक ग्राहक वृध्द महिलेने आपल्या पिशवीत ठेवलेली तब्बल ४५ हजार रुपयांची रक्कम पिशवीसह चोरुन पोबारा करण्याचा प्रयत्न दोन अनोळखी महिलांनी केल्याची घटना मागील आक्टोंबर महिन्यात दि.१८ आक्टोंबर २०२४ रोजी घडली होती परंतु बॅंकेतील कर्तव्यदक्ष लिपीकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता याचं घटनेची पुनरावृत्ती पुन्हा दि.०२ डिसेंबर २०२४ रोजी घडली असून एका महिला खातेदाराने बँकेतून ३० हजार रुपये काढत हे पैसे पिशवीत ठेवले असतांनाचे पाहून एका अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत शिताफीने या महिलेजवळील पिशवी कापून ३० हजार रुपये अलगद काढून घेत लंपास केल्याने एकच खळबळ माजली होती त्यापुर्वी देखील बँक खातेदार ग्राहकांकडील पैसे पळवल्याची घटना घडली होती परंतु या गंभीर बाबीकडे गांभिर्याने लक्ष केंद्रित करुन महाराष्ट्र बँकेत सुरक्षारक्षक तैनात करण्याची जवाबदारी शाखाधिकारी चंद्रकांत कच्छवे यांनी पार पाडण्याच्या दृष्टीने कठोर पावल उचलली नाही ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.

महाराष्ट्र बँक पुर्णा शाखेतील शाखाधिकारी चंद्रकांत कच्छवे यांच्या बेजबाबदार कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले असून महाराष्ट्र बँकेचे एटीएम सुविधा केंद्र जवळपास अकरा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे महाराष्ट्र बँक प्रशासनाने एटीएम सुविधा केंद्राच्या नवीन जागेसाठी मागील पाच महिन्यांपासून भाडेकरार केला परंतु एटीएम सुविधा केंद्र कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची तत्परता शाखाधिकारी कच्छवे यांनी दाखवली नाही विशेष म्हणजे नवीन एटीएम सुविधा केंद्राच्या जागेचे भाडे बँक मागील पखच वर्षांपासून अदा करीत आहे असे असताना महाराष्ट्र बँकेतील एटीएम कार्ड धारकांना एटीएमद्वारे आपला व्यवहार करतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून नाईलाजास्तव महाराष्ट्र बँकेत रक्कम काढण्यासाठी व जमा करण्यासाठी जावे लागत असल्याने बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे बँक ग्राहकांच्या रक्कमेवर हात साफ करीत आहेत.

महाराष्ट्र बँक शाखाधिकारी चंद्रकांत कच्छवे यांच्या एकाधिकार कच्छवेशाहीचा फटका विविध शासकीय योजनेतील कर्ज लाभार्थ्यांना देखील सोसावा लागत असून जिल्हा उद्योग केंद्रामार्फत लाभार्थ्यांना आवश्यक नसतांना नियमबाह्य जमानतदार देण्याची सक्ती जमानतदार न दिल्यास प्रत्येक कर्ज लाभार्थ्याला ०१ लाख रुपयांच्या एफडीआरसह करंट अकाऊंटची सक्ती केली जात आहे याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे शाखाधिकारी कच्छवे यांनी अशा देखील लोकांना दोन/दोन लाख रुपयांची कर्जे वाटप केलेली असल्याचे समजते ज्यांनी आपले व्यवसाय फुटफाटवर अतिक्रमण केलेल्या जागांवर थाटले आहेत अशा लोकांना कर्ज देतेवेळी जागे संदर्भात कोणत्या कागदपत्रांच्या आधारे कोणत्या नियमानुसार ॲग्रिमेंट केले असावे हे त्यांनाच माहीत एकंदर महाराष्ट्र बँकेतील एकाधिकार व बेजबाबदार'कच्छवेशाही' महाराष्ट्र बँक ग्राहक खातेदारांच्या हितासह बँकेच्या देखील हितासाठी निष्क्रिय ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या