🌟नांदेड सा.बां.विभाग कार्यालयासमोर थकीत बिलाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न.....!


🌟या घटने संदर्भात शिवाजी नगर पोलिस स्थानकात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते🌟

नांदेड (दि.१३ जानेवारी २०२५) :- नांदेड शहरातील शिवाजी नगर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर केलेल्या कामाचे थकीत बिल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या विरोधात आमरण उपोषणाला बसलेल्या गुत्तेदारासह त्यांच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची भयंकर घटना आज सोमवार दि.१३ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली सुदैवाने उपोषणकत्र्यांना जाग आल्यामुळे मोठा अनर्थ टळला सदरील घटने संदर्भात आज सोमवारी सायंकाळपर्यंत या घटने संदर्भात शिवाजी नगर पोलिस स्थानकात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की माळवदा येथील गुत्तेदार राजू चुन्नपा हुलगुंडे यांनी मौजे ताडकळस ते धानोरा काळे पालम या ०८.५ किलोमीटर विवीए डांबडीकरणाच्या कामाचे टेंडर घेतले होते सदरील काम पुर्ण करून अनेक वर्षांचा कालावधी उलटला तरी देखील सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड यांच्याकडून कामाचे बिल मिळाले नाही या संदर्भात गुत्तेदार राजु हुलगुडे यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला निवेदने देखील दिली परंतू उपयोग झाला नाही. यामुळे थेट मुंबई येथे उपोषण केले यानंतर बांधकाम विभागास विल अदा करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे बिल त्यांना दिले नाही यामुळे नाईलाजास्तव पुन्हा नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले असे उपोषणकर्ते हुलगुंडे यांनी सांगीतले या निवेदनानुसार दि.३० डिसेंबर २०२५ पासून हुलगुंडे यांनी काही संघटनाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक कार्यालयासमोर कुंटुबासोवत उपोषण सुरू केले या उपोषणात पत्नीसह लहान मुले उपोषणात सहभागी झाले आहेत. तरीही अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली नाही उलट सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या प्रवेश व्दारालगत सुरू असलेल्या उपोषणस्थळी हुलगुंडे कुटुंब रविवारी रात्री झोपले असता मध्यरात्री अज्ञात आरोपीनों त्यांचे अंथरून,पांघरून पेटवून देत जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

 या अमानवीय घटनेत उपोषण स्थळावरील साहित्य जळाले आग जबर असल्याने आगीची झळ लागल्याने उपोषणकर्ते राजु हुलगूडे यांना जाग आली आणि थोडक्यात संपूर्ण कुटुंब बचावले असे उपोषणकर्ते राजू हुलगुंडे यांनी यावेळी सांगीतले यापुर्वी देखील त्यांनी थकीत बिलाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते तेव्हा दि.०४ डिसेंबर २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास काही जणांनी त्यांना जबर मारहाण केली होती या प्रकरणी आठ जणांविरूद्ध शिवाजीनगर पोलिस स्थानकात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता आता उपोषणकर्त्या कुटुंबास जीवंत जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने अक्षरशः खळवळ उडाली असून  शिवाजीनगर पोलिसांनी आज सोमवार दि.१३ जानेवारी रोजी सकाळी घटनास्थळी भेट दिली परंतू सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल केला नाही असे हुलगुंडे यांनी सांगीतले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या