🌟जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत पंधरवड्यात शाळेमध्ये प्राथनेनंतर कुष्ठरोग बाबतच्या प्रतिज्ञाचे वाचन🌟
परभणी (दि.31 जानेवारी 2025) :- परभणी जिल्ह्यात दि.30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याबाबत केंद्रशासनाने निर्देश जारी केले आहेत. राज्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत 30 जानेवारी रोजी कुष्ठरोग निवारण दिन व 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2025 या पंधरवड्यात विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभिमान-2025 यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक (दि. 22) रोजी संपन्न झाली.
जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत पंधरवड्यात शाळेमध्ये प्राथनेनंतर कुष्ठरोग बाबतच्या प्रतिज्ञाचे वाचन करणे, शाळेतील सुचना फलकावर कुष्ठरोगाबाबत संदेश लिहिणे, शाळेमध्ये नुक्कड-नाटक, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कविता वाचन, कटपुतळी, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य इत्यादी जनजागृती कार्यकम राबविणे, लवकर निदान व वेळेवर उपचाराचे महत्त्व तसेच कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज दूर करण्याचे महत्त्व प्रसिध्दी माध्यमाद्वारे प्रसिध्द करणे, स्थानिक केबल व वर्तमानपत्रात स्पर्श अभियानाची प्रसिध्दी व लेख लिहिणे, स्थानिक महिला मंडळे, बचत गट, तरुण मंडळे यांच्या सभा आयोजीत करणे, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांची कार्यशाळा आयोजीत करणे, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शन, आरोग्य मेळावे भरविणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत “कलंक कुष्ठरोगाचे मिटवू यासन्मानाने स्विकार करु या" हे या वर्षीचे घोषवाक्य आहे......
0 टिप्पण्या