🌟महोत्सवात ६५ फूट उंच उभारण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मच्या पायऱ्या तुटल्याने अपघात🌟
बागपत : उत्तर प्रदेश राज्यातील बागपतमध्ये काल मंगळवार दि.२८ जानेवारी २०२५ जैन समुदायाच्या निर्वाण महोत्सवादरम्यान झालेल्या भयंकर अपघातात ७ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
या महोत्सवात ६५ फूट उंच उभारण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मच्या पायऱ्या तुटल्या. त्यामुळे अनेक भाविक एकमेकांवर कोसळू लागले व चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या अपघातात ७भाविकांचा मृत्यू झाला, तर ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बागपत शहरापासून २० किमी अंतरावर असलेल्या बरौत तहसीलमध्ये सकाळी ८ च्या दरम्यान हा अपघात झाला.....
0 टिप्पण्या