🌟परभणी तालुक्यातील मिरखेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी डोमच्या साह्याने घेतला तारांगणाचा आनंद....!


🌟यावेळी शिक्षकवृंद,गावातील शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते🌟


परभणी :- दि.14 जानेवारी हा दिवस मकर संक्रांतीचा दिवस तसेच भूगोल दिन म्हणूनही साजरा केला जातो आज जिल्हा परिषद शाळा  मिरखेल येथे विद्यार्थ्यांना डोमच्या साह्याने तारांगणाचा आनंद व अनुभव देण्यात आला यात अवकाश गंगा व त्यातील सर्व ग्रह तारे दाखवण्यात आले मुलांनी स्वतः डोळ्यांनी पाहून त्यावर प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या.

सूर्याचे प्रक्षेपण बघणे, बुध ग्रह ते युरेनस ग्रहापर्यंत प्रत्येक ग्रहाला रंग रूपासह अनुभवने, ग्रहांचे परिवलन परिभ्रमण समजून घेणेही खूप अनुभवदायी आहे . शिक्षक पुस्तकाच्या माध्यमातून शिकवतात चित्र दाखवतात प्रोजेक्टरवरून शिकवतात. पण हा अनुभव मुलांना आनंददायी आणि भविष्यात खगोलशास्त्राविषयी रस निर्माण करणारा निश्चितच ठरेल.यामध्ये हा. सर्व दाखवण्यासाठी पोलाद स्टील कंपनी तर्फे दाखवण्यात आला.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,राजेद्र देशमुख अनंत देशमुख शिवाजी धामने .शाळेचे मुख्याध्यापक अशोक लोखंडे मेघा करेवार सुप्रिया श्रीमाळी उर्मिला जोगदंड महेश शेवाळकर रूपाली लव्हांडे गजानन सोळके व सर्व शिक्षकवृंद,गावातील शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या