🌟शिबिराला मोठा प्रतिसाद : ३० जानेवारीपर्यंत हे शिबिर चालणार असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली🌟
परभणी (दि.२५ जानेवारी २०२५) - परभणी येथील आरपी मेडिकल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये फिजिओथेरपी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत असून ३० जानेवारीपर्यंत हे शिबिर चालणार आहे अशी माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
परभणी शहरात फिजिओथेरपी साठी विशेष सुविधा गरजेची होती, रुग्णांना फिजिओथेरपी बाबत उपचार करण्यासाठी मोठ्या शहरात जावे लागत होते, त्यामुळे रुग्णांना आर्थिक व मानसिक संकटाला सामोरे जावे लागत होते,त्यामुळे ही गरज ओळखून आमदार डॉ. राहुल पाटील यांनी परभणी मेडिकल कॉलेज येथे ही सुविधा उपलब्ध करून दिली. फिजिओथेरपी साठी लागणाऱ्या सर्व आत्याधुनिक सुविधा परभणी मेडिकल कॉलेज येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, सुसज्ज आणि अद्यावत यंत्रणा उपलब्ध होताच आमदार पाटील यांनी मोफत शिबिर सुरू केले आहे, या शिबिराला सुरुवातीपासूनच मोठा प्रतिसाद लाभत असून रुग्णांचा वाढता प्रतिसाद पाहता हे शिबिर 30 जानेवारीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे, यामध्ये शारीरिक आजारावर उपचार करण्यासाठी तसेच ताणतणाव कमी करण्यासाठी विविध तंत्रे उपलब्ध आहेत, तज्ञ डॉक्टर आधुनिक पद्धती विषयी मार्गदर्शन करत आहेत. दररोज मोठ्या संख्येने शहरासह ग्रामीण भागातून रुग्ण येत आहेत, तज्ञ डॉक्टर अत्याधुनिक उपचार पद्धतीने उपचार करत आहेत त्यामुळे रुग्णातून समाधान व्यक्त केले जात आहे,
त्यामुळे अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या