🌟पालम तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तालुध्यक्षपदी प्रसाद पौळ यांची नियुक्ती.....!


🌟तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्तीचेपत्र हभप.पुरुषोत्तम महाराज झाडगावकर यांच्या हस्तें प्रदान🌟 


परभणी (दि.१७ जानेवारी २०२५) - अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पालम तालुका अध्यक्षपदी प्रसाद पौळ यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष संदीप गव्हाणे यांनी मराठवाडा अध्यक्ष धाराजी भुसारे यांच्या सल्याने केली या नियुक्तीचे पत्र हभप.पुरुषोत्तम महाराज झाडगावकर यांच्या हस्ते देण्यात आले.

अखिल भारतीय मराठा महासंघाला 125 वर्ष पूर्ण होऊन 125 व्या वर्षात पदार्पण केले आहे त्या अनुषंगाने संघटन बांधणी तसेच शतकोत्तर रोपे महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून संघटन बांधणीसाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रसाद पौळ यांची नियुक्ती 15 जानेवारी 2025 रोजी जिल्हाध्यक्ष संदीप गव्हाणे यांनी केली या नियुक्तीचे पत्र ह भ प पुरुषोत्तम महाराज झाडगावकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव झांबरे, जिल्हा युवा अध्यक्ष विशाल तनपुरे, रामदास अवचार, बाबाराव गाडगे, सुभद्राताई अरकुले, ललिता पतंगे सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या