🌟ध्रुव साकोरे यांच्या दोन शोधनिबंधांना आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रसिद्धी.....!


🌟राज्यमंत्री मेघनाताई साकोरे यांच्या चिरंजीवांचे आंतरराष्ट्रीय यश🌟 


मुंबई / पुणे / परभणी : राज्यमंत्री तसेच परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर - साकोरे यांचे पुत्र ध्रुव दिपक साकोरे यांचे दोन शोधनिबंध नुकतेच प्रकाशित झाले आहेत. प्रतिष्ठित अशा जर्नल ऑफ इमर्जिंग टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च (जेईटीआयआर) या आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये २ शोध निबंध प्रकाशित झालेले ते युवा संशोधक ठरले असून ध्रुव यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे ध्रुव साकोरे हे सध्या लंडन येथील बेस बिझनेस स्कूल येथे बीएससी फायनान्स (अर्थशास्त्र) चे शिक्षण घेत आहेत. शोध निबंध ( रिसर्च पेपर) लिहून तो प्रकाशित होणे हे प्रत्येक अभ्यासकाचे स्वप्न असते. शोध निबंध प्रसिद्ध झाल्याने त्यांनी केलेले संशोधन जगजाहीर झाल्यावर त्याचा फायदा व मार्गदर्शन इतरांना होते. 


ध्रुव साकोरे यांचा पहिल्या शोध निबंधातातून  कार्बन डायॉक्साईडच्या  उत्सर्जनाचे मूल्यांकन , सकल  राष्ट्रीय उत्पन्न ( जीडीपी), ऊर्जा  वापर यांचा अभ्यास करून  भविष्यकालीन विकास, ऊर्जा कार्यक्षमता आणि तांत्रिक बदल यांचे  मूल्यांकन  करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर दुसऱ्या शोध निबंधातून आजच्या जगाला शाश्वततेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पर्यावरणीय ऱ्हास, नैसर्गिक आपत्ती, हवामानातील  बदल, अन्न आणि पाण्यची असुरक्षितता, आर्थिक अस्थिरता, युद्ध आणि दहशतवाद, आंटार्टिक खंडातील बर्फाचे वितळणे, प्रवाळ भिंती नष्ट होणे तसेच  महासागराचे बदलते स्वरूप, अन्न आणि तेलाच्या किंमतीतील अलीकडील वाढ आदी विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. त्यासोबतच सामाजिक अस्थिरतेच्या धोक्यांमुळे हरित ऊर्जेमध्ये गुंतवणूक करणे आणि धक्के सहन करण्याची क्षमता निर्माण करणे किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट करण्यात आले आहे. या हवामान बदलाच्या संकटांचा सामना करण्यासाठी प्रचंड आंतरराष्ट्रीय निधी आवश्यक असल्याचे सुतोवाच ध्रुव साकोरे यांनी आपल्या शोधनिबंधातून केले आहे. या लेखात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राने एकत्र येऊन हरित संक्रमणासाठी निधी उभारणे आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे किती महत्त्वाचे आहे, यावर चर्चा करण्यात आली आहे. या संशोधनाच्या माध्यमातून  पूरक  वातावरण उपलब्ध असल्यास खाजगी क्षेत्र अशा प्रकल्पांना स्वतंत्रपणे वित्तपुरवठा करू शकेल, असा सिद्धांत मांडला आला आहे.

जेईटीआयआर सारख्या जर्नल मध्ये शोध निबंध प्रकाशित होणे प्रतिष्ठेचे समजले जाते. या जर्नल मध्ये राज्यमंत्री मेघना साकोरे यांचे पुत्र ध्रुव दीपक साकोरे यांचे २ शोध निबंध प्रकाशित झाले असल्याने ध्रुव यांचे अभिनंदन केले जात आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या