🌟स्व.रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पत्रकार बगाटे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟
पुर्णा :- पुर्णेतील सेवानिवृत्त शिक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे यांची नांदेड येथील मीमांसा फाऊंडेशन दैनिक समिक्षा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संब व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्या वतीने दरवर्षी दिला जाणाऱ्या स्व.रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
स्व.रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा आज रविवार दि.०५ जानेवारी रोजी सायंकाळी मिनी रेस्ट हाऊस सभागृह नांदेड येथे विविध मान्यवराच्या उपस्थितीत होणार आहे स्व.रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पत्रकार विजय बगाटे यांचे पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो,रिपाइंचे जेष्ठ नेते प्रकाश कांबळे,माजी उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे, आदींसह मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे......
0 टिप्पण्या