🌟 शिवसेना उबाठा नेते खा.संजय राऊत यांनी केलेल्या घोषणेमुळे महाविकास आघाडीला बसला धक्का🌟
मुंबई: - महाविकास आघाडीमुळे पक्ष वाढीला फटका बसतो. कार्यकत्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे नागपूरपासून मुंबईपर्यंत सर्व महापालिका,जिल्हा परिषदा,नगरपालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत आम्हाला आमची शक्ती दाखवायची आहे जे काही होईल ते होईल असे सांगत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी स्ववळाची घोषणा केली. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे गटाची बदललेली भूमिका, भाजपाबावत वाढलेला जिव्हाळा यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे संकेत मिळत होते दिल्ली विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे यांनी आम आदमी पार्टीला पाठींबा दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होतीच त्यातच खा. संजय राऊत यांनी आज सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करत आघाडीला धक्का दिला.
0 टिप्पण्या