🌟मुक्तता मॅनहॅटन न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय🌟
वॉशिंग्टन : पॉर्न स्टारला पैसे देऊन गप्प करण्याच्या खटल्यात अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बिनशर्त मुक्तता मॅनहॅटन न्यायालयाने केली आहे. न्या. जुआन मर्चेन यांनी ट्रम्प यांची बिनाशर्त सुटका करण्याचा निकाल दिला. ट्रम्प यांना ३४ प्रकरणांत कोणतीही शिक्षा किंवा दंड केला नाही. याचाच अर्थ नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांना तुरुंगवासाची शिक्षा किंवा दंड होणार नाही. गेल्यावर्षी मॅनहॅटन कोर्टाने ट्रम्प यांना ३४ प्रकरणांमध्ये दोषी ठरवले होते. अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांना शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात येणार होती. ट्रम्प यांनी शिक्षेपासून वाचण्यासाठी सुप्रीम कोर्टात अपील केले होते.....
0 टिप्पण्या