🌟तत्कालीन शिक्षणमंत्री केसरकरांनी ३० हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती प्रत्यक्षात २३ हजार शिक्षकांचीच भरती🌟
पुणे :- शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्तपदांपैकी ८० टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती ३० जूनपूर्वी केली जाणार आहे. त्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास १४ ते १५ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ३० हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती, पण त्यातील २३ हजार शिक्षकांचीच भरती झाली. झेडपी शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे.
0 टिप्पण्या