🌟परभणी शहरातील कारेगाव रस्त्यावरील व्यापार्‍यांचा नाल्या बांधकामाच्या मागणीसाठी रास्तारोको.....!

 


🌟या भागातील रस्त्यांच्या आसपास खोदकाम करण्यात आल्याने व्यापार्‍यांचे दैनंदिन व्यवहार अक्षरशः ठप्प🌟

परभणी : परभणी शहरातील कारेगाव रस्त्यावरील नाल्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत या मागणीसाठी परिसरातील संतप्त व्यापार्‍यांनी काल बुधवार दि.२९ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास जोरदार रास्तारोको आंदोलन केले.

          देशमुख कॉर्नर परिसरातील या रस्त्यावर संबंधित कंत्राटदाराने दुतर्फा नाल्यांची कामे सुरु केली खरी परंतु सदरील कामे कासवगतीने सुरु आहेत. सहा महिन्यांपासून ठिकठिकाणी खोदकाम केल्या गेले आहे. त्यामुळे दुतर्फा व्यापार्‍यांना व्यापार करणे अक्षरशः मुश्किल होवून बसले आहे. या विरोधात व्यापार्‍यांनी सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, संबंधित यंत्रणांसह कंत्राटदारानेसुध्दा ढुंकूनही त्याकडे पाहिले नाही. त्याचा परिणाम संतप्त व्यापार्‍यांनी बुधवारी जोरदार रास्तारोको केला. त्याद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. या भागातील व्यापार्‍यांचे दैनंदिन व्यवहार अक्षरशः ठप्प होवू लागले आहेत. ग्राहकांना दुकानांवर येता येईनासे झाले आहे, असे व्यापार्‍यांनी निदर्शनास आणून दिले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या