🌟शासकीय आदेशाची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी महाराष्ट्र सरकारकडे सुपुर्द केली🌟
नवी दिल्ली :- महाराष्ट्र राज्याची मायबोली मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे या संदर्भात केंद्र शासनाने आदेश जारी केला आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती मात्र शासन आदेश न काढल्यान विरोधकांनी जोरदार टीका केली होती
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतच्या शासकीय आदेशाची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी आज मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली. उदय सामंत हे अभिजात भाषेची अधिसूचना स्वीकारण्यासाठी राजधानी दिल्लीत दाखल झाले होते. देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर, अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी आपली मराठी भाषा ही आता देशातील ७ वी भाषा ठरली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या ३ ऑक्टोबरच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेतला होता.
0 टिप्पण्या