🌟अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संभाव्य घोषणांकडे शेतकऱ्यांचे लक्ष🌟
नवी दिल्ली :- देशभरातील शेतकऱ्यांच्या १ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत मिळणारी वार्षिक ६००० रुपयांची रक्कम वाढवून १०००० रुपये करण्याची जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल आणि त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संभाव्य घोषणांकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना १ डिसेंबर २०१८ रोजी सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ३ हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात. हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेंतर्गत १८ हप्ते जारी केले आहेत. १९ वा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये मिळणे अपेक्षित आहे......
0 टिप्पण्या