🌟परभणीत महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त पोलिस दलातर्फे वाहतूक नियमांबाबत जनजागृती....!


🌟जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी व अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती🌟 


परभणी (दि.05 जानेवारी 2025) : महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पोलिस दलातर्फे दि.02 जानेवारी ते दि.08 जानेवारी दरम्यान जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्या अनुषंगाने परभणी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने देखील आज रविवार दि.05 जानेवारी रोजी संपूर्ण परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.


     परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी व अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी, सोनपेठ, पालम, बोरी, ताडकळस, चारठाणा पोलिस ठाण्याच्यावतीने आपापले हद्दीत महत्वाचे प्रवासी वाहतुकीच्या ठिकाणी व मुख्य चौकातात वाहन चालकांना वाहतूक नियमांबाबत माहिती देण्यात आली.

त्यामध्ये चालकांनी सुरक्षित वाहन चालविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मोटार सायकल चालवताना हेल्मेट व चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट वापरण्याचे महत्व समजावून सांगण्यात आले. मोटार वाहन कायद्यामध्ये असलेले नियम व तरतुदी या बाबत जनजागृती करण्यात आली. विशेषतः हेल्मेट घालून वाहन चालविणार्‍या वाहनधारकांचे बोरी पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांवतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तर पोलीस स्टेशन चारठाणा यांनी प्रवासी ट्रक व इतर  मोठे वाहनांना सुरक्षेकरिता  पाठीमागून रेडीयम लावण्याचे महत्व सांगून काही वाहनाना रेडीयम लावण्यात आले.

              दर्‍यान, या मोहिमेत पोलीस स्टेशन सोनपेठचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोल्लमवाड, पालमचे पोलीस निरीक्षक थोरात, बोरीचे सपोनि गोपीनवर, पाथरी सपोनि शिवस्वामी, ताडकळस सपोनि मोरे व चारठाणा पोलिस स्टेशनचे सपोनि अंधारे साहेब यांच्यासह संबंधित पोस्टेच्या अंमलदारांनी सहभाग घेतला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या