🌟रेल्वे उड्डाणपूल बांधकाम गुत्तेदार कंपन्यांना वाचवण्याचा तहसिलदारांसह महसुल प्रशासनाचा लाजिरवाणा प्रयत्न🌟
🌟गौण खनिज वाळू चोरीला प्रोत्साहन देऊन महसूल प्रशासनातील अधिकारीच ठरताय कोट्यावधी रुपयांच्या शासकीय महसूलाचे मारेकरी🌟
पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतील कोट्यावधी रुपयांचे शासकीय गौण खनिज वाळूसाठ्यांचे इंजिन बोट (सेक्शन पंप),जेसीबी तसेच परराज्यातील गोताखोर कामगार व तराफ्यांच्या साहाय्याने उत्खनन करून या चोरट्या अवैध वाळूचे संपूर्ण परभणी जिल्ह्यासह शेजारील नांदेड/हिंगोली जिल्ह्यात देखील असंख्य हायवा/टिप्पर/ट्रकांसह ट्रॅक्टरद्वारे वाळू तस्कर माफियांकडून तस्करी तर केली जातच आहे त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या अवैध चोरट्या वाळूची पुर्णा शहरासह तालुक्यातील शासकीय विकासकामांच्या बांधकाम गुत्तेदार कंपन्यांना देखील पुरवठा केला जात आहे.
पुर्णा शहरातील पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील हिंगोली गेट परिसरात मागील साडेपाच वर्षांपासून सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकामाचे कॉन्टॅक्ट घेतलेल्या गुत्तेदार कंपन्या गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली.,महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ली कंपन्यांनी व आरएसव्ही कन्स्ट्रक्शन प्रा.ली.हैद्राबाद या कन्स्ट्रक्शन कंपन्या एमआयआरडीसी (महारेल) अंतर्गत रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम करीत असून या कंपन्यांनी रेल्वे उड्डाणपूल पिल्लर बांधकामासाठी क्रेशर मशीनद्वारा निर्मित क्रश सॅन्ड (काळ्या दगडापासून तयार केलेली कृत्रिम वाळू) ऐवजीं वाळू तस्कर माफियांनी गोदावरी-पुर्णा नदीपात्रांतून प्रचंड प्रमाणात बेकायदेशीररित्या उत्खनन केलेला अवैध चोरटा वाळूसाठा शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून वापर केला त्यामुळे सदरील रेल्वे उड्डाणपूलासह रेल्वे उड्डाणपूलाच्या आसपासच्या सिमेंट रस्त्यांचे सुरू असलेले बांधकाम देखील निकृष्ट व दर्जाहीन होत असून भविष्यात या रेल्वे उड्डाणपूल व आसपासच्या रस्त्यांच्या निकृष्ट कामामुळे फार मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुर्णा-गोदावरी नदीपात्रातून शासकीय गौण खनिज वाळूचे प्रचंड प्रमाणात उत्खनन करुन असंख्य वाहनांद्वारे तस्करीसह रेल्वे उड्डाणपूल बांधकाम गुत्तेदार कंपन्यांना तसेच अमृत भारत स्टेशन योजनांतर्गत पुर्णा रेल्वे स्थानक क्रमांक एकचे बांधकाम करणारी गुत्तेदार कंपनी अमृत भारत स्टेशन योजनांतर्गत प्लॉट फार्म क्रमांकचे बांधकाम करणारी गुत्तेदार कंपनी गती शक्ती कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडसह दस्तुरखुद्द तहसील कार्यालयाच्या मागील परिसरात तहसिलदार व तहसिल कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांचे बांधकाम करणाऱ्या बांधकाम गुत्तेदार आदींसह शहरातील नगर परिषदे अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत सुरु असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शासकीय विकासकामांसाठी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात एकही अधिकृत शासकीय वाळू धक्का नसतांना संबंधित गुत्तेदारांकडून वापरण्यात येत असलेला प्रचंड वाळूसाठा तहसिलदार माधवराव बोथिकर व महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्याच कृपादृष्टीने संपूर्ण तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतून शासकीय गौण खनिज वाळूचे प्रचंड प्रमाणात अवैध उत्खनन करुन हा चोरटा वाळूचा साठा पुरवला जात असल्याचे स्पष्ट झाले असून रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम करणाऱ्या गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली,महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ली. व आरएसव्ही कन्स्ट्रक्शन प्रा.ली.हैद्राबाद या कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी पुर्णा-पागरा ढोणे रोडवरील मिक्सर प्लॉन्टवर जवळपास बाराशे पंधराशे ब्रास एवढ्या प्रचंड प्रमाणात अवैध वाळूसाठा जमा केला होता या संदर्भात ०५ ऑगस्ट २०२४ रोजी रितसर लेखी तक्रारीनंतर ही तहसिलदार बोथीकर यांनी यांच्याकडून कारवाई नाही उलट संबंधित कंपन्यांना त्यांनी अवैध चोरट्या वाळू साठ्याची विल्हेवाट लावण्याची एकप्रकारे संधीच दिली ?
यानंतर प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रकाशित करताच तहसिलदार बोथीकर यांनी दि.०५ ऑगस्ट २०२४ रोजी २८ सप्टेंबर २०२४ रोजी स्वतःचे पित्तळ उघडे पडू नये याकरिता संबंधित रेल्वे उड्डाणपूल बांधकाम कंपन्यांच्या पुर्णा-पागरा ढोणे रोडवरील मिक्सर प्लॉन्टवर धाव घेऊन अवैध चोरटा वाळूसाठा जप्ती नाट्य रंगवले खरे परंतु सदरील अवैध चोरट्या वाळू साठ्याचे शासकीय नियमानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडून मोजमाप न करता संबंधित रेल्वे उड्डाणपूल गुत्तेदार कंपन्यांशी हितसंबंध जोपासत तलाठी सज्जा बरबडीचे तलाठी यांच्यामार्फत पंचणामा नाट्य रंगवून दिड हजार ब्रास ऐवजी केवळ ४५० ब्रास अवैध चोरटा वाळूसाठा दाखवून व संबंधित कंपन्यांवर पाचपट दंडात्मक कारवाई न करता संबंधित अवैध चोरट्या वाळुसाठ्याचा नियमानुसार लिलाव न करता परस्पर या वाळुसाठा संबंधित कंपन्यांना देऊन त्या बदल्यात आरएसव्ही कन्स्ट्रक्शन्स प्रा.ली.हैद्राबाद या कंपनीकडून प्रथमतः दि.०१ आक्टोंबर २०२४ रोजी ०३ लाख ४६ हजार ५०० रुपयें REF No.023913508732 चेक क्रमांक 999990 16 महाराष्ट्र गव्हरमेंट (जिआरएएस) या नावाने व सदरील चेक बाऊन्स झाल्यानंतर पुन्हा आरएसव्ही कन्स्ट्रक्शन्स प्रा.ली.हैद्राबाद या कंपनीकडून दि.१८ आक्टोंबर २०२४ रोजी तहसिलदार पुर्णा या नावाने REF 023913508732 चेक क्रमांक 999990 : 16 अश्या पध्दतीने संबंधित कंपन्यांचे हित साधत शासकीय महसूलाची वाट लावण्यात आली तहसिलदार माधवराव बोथिकर संबंधित कंपन्यांशी हितसंबंध जोपासत शासनाच्या महसुलाची सोईस्करपणे वाट लावून तालुक्यात शासकीय गौण खनिज वाळू तस्कर माफियांसह भ्रष्ट गुत्तेदार बांधकाम कंपन्यांच्या घशात घालत असल्याने या गंभीर प्रकारा संदर्भात एक जागरूक नागरिक म्हणून आम्ही दि.३० आक्टोंबर २०२४ रोजी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना लेखी स्वरूपात तक्रार देऊन शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून अवैध चोरट्या गौण खनिज वाळुचा बेकायदेशीर साठा केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली परंतु महसूल प्रशासनातील भ्रष्ट नौकरशाहांची साखळी इतकी मजबूत आहे की परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवक/जावक विभागातून रितसर खतवलेला तक्रार अर्जच गायब झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला त्यानंतर याच अर्जाची झेरॉक्स प्रत पुन्हा एकदा परभणी जिल्हा महसूल विभागाला द्यावी लागली निदान यानंतर तरी या प्रकरणाची चौकशी केली जाईल अशी अपेक्षा होती परंतु ही अपेक्षा देखील फोल ठरली पुर्णा तालुक्यातील गौण खनिज वाळू माती मुरूम दगडखडी आदींच्या प्रचंड उत्खननासह प्रचंड प्रमाणात होणाऱ्या तस्करीला अवैध गौण खनिज वाळू तस्कर माफिया जेवढे जवाबदार आहेत त्याहीपेक्षा जास्त जवाबदार तहसिलदार बोथीकर महसूल प्रशासन देखील जवाबदार असल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे......
0 टिप्पण्या