🌟बिड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी मुंबईतून होणार....!

 


🌟या समितीचे प्रमुख म्हणून मुंबईच्या उच्च न्यायालयातील निवृत्त न्या.एम.एल.तहलियानी यांची नियुक्ती🌟

मुंबई
:- संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवलेल्या बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी एसआयटीची स्थापना केल्यानंतर या अमानुष हत्याकांडाच्या चौकशीसाठी न्यायालयीन समिती ही गठीत केली होती या न्यायालयीन चौकशी समितीचा कारभार बीडमधून चालणार होता मुख्यालयाचे ठिकाण आधी बीड येथे निश्चित करण्यात आले होते मात्र आता उपसचिव हेमंत महाजन यांनी न्यायालयीन चौकशीचे मुख्यालय हे मुंबई येथे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

याबाबतचा शासन निर्णय देखील समोर आला
आहे मस्साजोगमधील दिवंगत संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्यात आली. या समितीचे प्रमुख म्हणून मुंबईच्या उच्च न्यायालयातील निवृत्त न्या.एम.एल.तहलियानी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तहलियानी यांच्या समितीचे कार्यालय बीड येथे राहिलं असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र न्या. एम.एल. तहलियानी यांनी पत्राद्वारे सरकारकडे विनंती करत मुख्यालय मुंबई येथे करण्याची विनंती केली. त्यानुसार शासनाने सोमवारी हे नवीन आदेश काढले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या