🌟सामान्य प्रशासन विभागाद्वारे जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर🌟
परभणी (दि.१८ जानेवारी २०२५) : परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार तथा राज्याच्या आरोग्यमंत्री सौ.मेघनाताई दिपक साकोरे-बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आज शनिवार दि.१८ जानेवारी रोजी सायंकाळी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची यादी जाहीर केली त्या यादीनुसार परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा राज्याच्या आरोग्यमंत्री सौ.मेघनाताई बोर्डीकर (साकोरे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे
दरम्यान, दिर्घ प्रतिक्षेनंतर परभणी जिल्ह्यास जिल्ह्याचा पालकमंत्री लाभला आहे त्यामुळे जिल्हावासीयांच्या अपेक्षासुध्दा कमालीच्या उंचावल्या आहेत पालकमंत्री सौ.मेघनाताई साकोरे या सर्व अपेक्षांची पूर्तता करतील अशी आशा जिल्हावासीय बाळगून आहेत. दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या या उचित निर्णयाचे जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातून स्वागत होत आहे.......
0 टिप्पण्या