🌟परभणी जिल्ह्यातील बांगलादेशीय घुसखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करा....!

 


(परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर वास्तव्यास : त्यांचा शोध घ्यावा याकरिता आज माननीय जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.)

🌟शिवसेनेची जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी🌟 

परभणी (दि.२१ जानेवारी २०२५) : परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशीय घुसखोर अनाधिकृतपणे वास्तव्यास असून पोलीस व महसूल प्रशासनाने या बांगलादेशी घुसखोरांचा शोध घ्यावा व त्यांच्या विरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

 शिवसेना नेते आनंद भरोसे, सहसंपर्क प्रमुख भास्करराव लंगोटे, उपजिल्हा प्रमुख माणिकराव पौंढे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज मंगळवार २१ जानेवारी रोजी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली या भेटीतून या शिष्टमंडळाने एक निवेदन सादर केले. त्यातून या जिल्ह्यात बांगलादेशीय घुसखोर कानाकोपर्‍यापर्यंत अनाधिकृतपणे कसे वास्तव्यास आहेत हे निदर्शनास आणून दिले. अलिकडे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशीय घुसखोरांची संख्या लक्षणीय वाढली असून त्यामुळेच महसूल व पोलिस प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने शोध मोहिम हाती घ्यावी व या घुसखोरांना या जिल्ह्यातून बाहेर काढावे अशी अपेक्षा व्यक्त केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या