🌟पुर्णा तालुक्यातील मागणी येथे मकर संक्रांति निमित्त वनभोजनाचे आयोजन....!


🌟कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेतकरी व्यवसायिक उद्योजक भोजनासाठी आवर्जून येतात🌟 

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील माखणी येथील शेतकरी पारंपरिक पद्धतीने एकत्रित होऊन मकर संक्रांतीचे औचित्य साधत दरवर्षी वनभोजनाचे आयोजन करीत असतात पारंपारिक पद्धतीने शेतकरी एकत्रित संक्रांती निमित्त वनभोजन का देतात ? सम हा उपसर्ग आहे प्रकरिता म्हणजे काय याचा अर्थ संक्रात म्हणतो संक्रात म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो यांचा विधी प्रतीक म्हणून तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्ही आम्ही देव तीळाला गोड गोड गोड जीव झाला जीव गोड होणे म्हणजे जीव पणा जाणे जीव म्हणजे प्रकृती राजे आहे म्हणजे देवाच्या राज्यात प्रवेश करणे होय ते कार्य प्रत्येक चे व्हावे व जीव पणाला परिपूर्णता यावी म्हणून वनभोजन सर्वांनी एकोप्याने जेवण करणे ही परंपरा वडिलोपार्जित माखणी या गावांमध्ये हजारो वर्षापासून सातत्याने चालू आहे ही परंपरा भविष्यात चालत राहणार आहे असे प्रगतीशील शेतकरी जनार्धन आवरगंड  माखणी कर यांनी प्रतिक्रिया दिली व तसेच माखणी शिक्षक सुरज पौळ यांनी पण आपल्या मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेतकरी व्यवसायिक उद्योजक भोजनासाठी आवर्जून येतात या कार्यक्रमाला महिलांचाही मोठा सहभाग असतो हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालासाहेब आवरगंड अंकुश आवरगंड नागोराव आवरगंड आनंद आवरगंड  महाजन नवनाथ आवरगंड नामदेव आवरगंड  बळी आवरगंड जयराम भुजबळ  आधी शेतकऱ्यानी परीश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या