🌟सिलेंडर स्फोटाच्या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीत हानी नाही🌟
परभणी (दि.१२ जानेवारी २०२४) - परभणी शहरातील अत्यंत वर्दळीच्या वसमत रस्त्यावरील शिवशक्ती अपार्टमेंट समोर असलेल्या तुलसी उपहारगृहा समोरील मातोश्री वडापाव स्टॉलवर वापरात असलेल्या दोन गॅस सिलेंडरचा आज रविवार दि.१२ जानेवारी रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास एका पाठोपाठ भयंकर स्फोट झाल्याने संपूर्ण वसमत रोड अक्षरशः दणाणला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही या भागात मातोश्री वडापावचा स्टॉल प्रसिद्ध आहे. या स्टाँल चालकाने नेहमीप्रमाणे आपले व्यवहार आटोपून रात्र घर गाठले, परंतु रात्री सव्वा बाराच्या सुमारास या स्टॉल मधील एका सिलेंडरचा अचानक मोठा स्फोट झाला. तो ऐवढा कि त्या स्फोटाचा आवाज लांबपर्यंत ऐकू आला. या स्फोटाने आगीचे लोळ उठले.अख्खा वसमत रस्त्यावर लांबपर्यंत हे आगीचे लोळ दिसत होते.
या रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली,आग ओळखून अग्निशामक दलास ती बाब कळवली.परंतु आगीचे बंब येण्यापूर्वीच त्या स्टॉल मधील दुसऱ्या सिलेंडरचा त्या पाठोपाठ पाचव्या मिनिटांनीच पुन्हा मोठा स्फोट झाला. त्यामुळेही वसमत रस्ता या आवाजाने दणाणलाच, सुदैवाने या स्टॉलवर,परिसरात कोणतीही व्यक्ती उभी नव्हती, या आगीत स्टॉल पूर्णतः जळून खाक झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग पूर्णतः आटोक्यात आणली, दरम्यान स्टॉल वरील कढईतील गरम तेल सिलेंडरवर पडल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.......
0 टिप्पण्या