🌟परभणी विभागांतर्गत विभागीय नियंत्रक व आगारप्रमुख या बसेसच्या प्रतिक्षेत : ५ आगारांमधून चार्जींग सेंटरची उभारणी🌟
परभणी : परभणी जिल्हा राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारात लवकरच ईलेक्ट्रीक बसेसचा ताफा दाखल होणार असल्याचे वृत्त हाती आले असून परभणी विभागांतर्गत सर्व आगारातील सद्यस्थितीत ४०२ बसेस उपलब्ध आहेत त्यापैकी अनेक बसेस अक्षरशः खिळखिळ्या झाल्या आहेत. गेल्या दीड वर्षांपूर्वी यापैकी ४० बसेस स्क्रॅप करण्यात आल्या. त्यामुळे त्याजागी नवीन बसेस उपलब्ध होतील हे अपेक्षित होते परंतु दीड वर्ष उलटल्यानंतरसुध्दा अद्यापही महामंडळाद्वारे एकही नवीन बस विभागात दाखल झाली नाही. मात्र येत्या काही महिन्यात जवळपास ४०-५० नवीन बसेस उपलब्ध होतील, असो होरा व्यक्त होत आहे. परभणी विभागांतर्गत विभागीय नियंत्रक व आगारप्रमुख हे या बसेसच्या प्रतिक्षेत आहेत.
दरम्यान, परभणी विभागांतर्गत परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड व हिंगोली या आगारांमधून सद्या ईलेक्ट्रीक बसेस उपलब्ध होतील या पार्श्वभूमीवर चार्जींग सेंटर उभारणीचे काम सुरु केल्या गेले आहे, हे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यामुळे परभणी विभागास चार्जींग वर चालणार्या बसेसचा ताफा उपलब्ध होणार आहे. चार्जींगवर चालणार्या १७० बसेसची मागणी परिवहन विभागाद्वारे करण्यात आली असून तेवढ्याच बसेस उपलब्ध होतील, अशी चिन्हे आहेत......
💫परभणी बस स्थानकातून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे दररोज हाल :-
परभणी आगारात मागील दिड ते दोन वर्षांच्या कालावधीत एकही बस नव्याने दाखल झाली नाही त्यामुळे खिळखिळ्या असणार्या बसेस जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेरच्या मार्गावर धावत आहेत. त्यातून छोटे मोठे अपघात मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सर्वसामान्य प्रवाशी या वाढत्य अपघातामुळे अक्षरशः हैराण आहेत, चिंतेत आहेत. परभणी विभागास महामंडळाने शंभरावर बसेस उपलब्ध कराव्यात, असा सूर प्रवाशी संघटनांचा असून त्याशिवाय या जिल्ह्यातील एसटी वाहतूक सुरळीत होणार नाही, असे मत व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या स्थानिक अधिकार्यांद्वारे २०२३ या वर्षभरात भंगारात काढलेल्या 40 बसेसपोटी तेवढ्याच बसेस नव्याने मिळाव्यात, तसेच यावर्षीसुध्दा भंगारात काढल्या जाणार्या जवळपास ३० ते ३५ बसेसपोटी अशोक लेलॅन्ड या कंपनीच्या बसेस उपलब्ध व्हाव्यात, असे प्रयत्न सुरु आहेत. या बसेस उपलब्ध झाल्या तर जिल्ह्यांतर्गत सात आगारातील बससेवा सुरळीत होईल.....
0 टिप्पण्या