🌟पुर्णा शहरातील पत्रकार भवनात व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने दर्पण दिन साजरा....!

 


🌟यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

पुर्णा (दि.०६ जानेवारी २०२४) - पुर्णा शहरातील जुना मोंढा भागातील नगर परिषद गाळ्यांच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पत्रकार भवनात ता.६ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता व्हाईस ऑफ मीडिया पूर्णा शाखेच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे,पोलिस काॅ.राठोड उपस्थित होते.यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी छत्तीसगड बिजपूर येथील पत्रकार मुकेश चंद्राकार यांच्या हत्या झाली होती.त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी आनंद ढोणे,नारायण सोनटक्के,शिवाजीराव बोबडे,सलिम, विष्णू चापके, मारोतराव देसाई, संजय पांचाळ सह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.या प्रसंगी आनंद ढोणे यांनी उपस्थित पत्रकारांना येत्या १९ जानेवारी रोजी गंगाखेड येथे व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतीने होणा-या भव्य दिव्य दर्पण दिन सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे  आवाहन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन शिवाजी बोबडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या