🌟 अशी माहिती हिंगोली येथील वनराई चे ज्येष्ठ स्वंयसेवक पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी पत्रकारांना दिली🌟
अकोला :- अकोला येथे पर्यावरण क्षेत्रातील नामांकित संस्था 'वनराई'चे संस्थापक पद्मविभूषण डॉ.मोहन धारिया ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्त वनराई बालकुमार साहित्य संम्मेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती हिंगोली येथील वनराई चे ज्येष्ठ स्वंयसेवक पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी पत्रकारांना दिली.
अकोला जिल्हा मराठासमाज व 'वनराई' अकोला च्या संयुक्त विद्यमाने बालकुमार साहित्य संमेलन बालकुमार,कुमारिका आणि विद्यार्थी व पर्यावरण प्रेमिंच्या सहभागाने दि.२० जानेवारी २०२४ रोजी हे एक दिवसीय सम्मेलन अकोला जिल्हा मराठा मंडळ सभागृहात रामदास पेठ अकोला येथे आयोजीले आहे.सातपुड्याच्या निसर्ग कविता,मी नदी बोलते,वनराई संदेश ,वृक्ष दिंडी,जल जंगल जमीन सुरक्षा, पुढील पिढ्यांच्या व निसर्ग आणि मानव कल्याणार्थ करावयाचे प्रत्येकाचे कर्तव्य,मानव हव्यासापोटी निर्माण झालेली भयावह परिस्थिती ची माहिती आदी बाबत ह्या संमेलनातून जनजागरण करण्यात येणार असल्याची माहिती ह्या संमेलनाचे एक आधारस्तंभ वनराई चे ज्येष्ठ पदाधिकारी समाजसेवक बबनराव कानकिरड ह्यांनी प्रसिध्दी पत्रकार द्वारे दिली आहे.
संमेलनाचे उदघाटण अकोलां पूर्व चे विधानसभा सदस्य पर्यावरण प्रेमी आ. रणधीर सावरकर ह्यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे.संमेलनाच्या अध्यक्ष पदी पुणे निसर्ग मंडळाचे अध्यक्ष निसर्ग पत्रकारितेतील महामेरू सुरेशचंद्र वारघडे तर स्वागताध्यक्षपदी समर्थ शिक्षण संस्था संचालक प्रा.नितीन बाठे हे राहणार आहेत.ह्या प्रसंगी पर्यावरण ,जैविक शेती आदी अनेक क्षेत्रात अग्रगण्य ज्येष्ठ पत्रकार व देशोन्नती वृत्त पत्राचे प्रमुख प्रकाशभाऊ पोहरे,वनराई चे सचिव व वनराई मासिकाचे संपादक पर्यावरण तज्ञ अमित वाडेकर पुणे ह्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे.वनराई परिवारातील ज्येष्ठ स्वयंसेवक व पदाधिकारी मधू भाऊ घारड,महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाचे राज्य कार्याध्यक्ष वनराई परिवारातील हिंगोलीचे पत्रकार डॉ.विजय निलावार,महाबीज चे संचालक डॉ.रणजित सपकाळ ,आदी उपस्थित राहणार आहेत.संम्मेलनाचे यशस्वीतेसाठी पर्यावरणप्रेमी सर्वश्री बबनराव कानकिरड सह प्रकाश पाटील, प्रा.विवेक हिवरे,डॉ.विनोद बोर्डे,अकोला जिल्हा मराठा मंडळ कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी सदस्य,वनराई अकोला चे गजानन चौधरी, प्रा.गजानन वाघ ,वनराई परीवार ,शिक्षक व सेवाभावी संस्था पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.सदरील संम्मेलनात वनराई परीवार लातूर चे ऍड.नारायण सोमवंशी,नांदेड चे गोविंद बजाज,नाशिक चे मांगीलाल महाले ,वनराई यवतमाळ चे प्रकाश देठे हिंगोली चे पत्रकार डॉ.विजय निलावार,आहेत.सर्व निमंत्रित पर्यावरण प्रेमींनी ह्यात सहभागी होवून मानव आणि निसर्ग कल्याणार्थ पुण्याई चे भागीदार व्हावे असे आवाहन वनराई चे बबनराव कांनकिरड ह्यांनी केलं आहे......
0 टिप्पण्या