🌟२६ जानेवारी पर्यंत सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर होणार - चंद्रशेखर बावनकुळे


🌟२६ जानेवारीला सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री झेंडावंदन करणार :  चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती🌟                                  

 ✍️ मोहन चौकेकर 

पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांबाबात महायुती सरकारकमध्ये कुठलच पेच नाही. युती असल्याने सर्वांच्या मतांचा विचार करावा लागतो. मात्र ही अडचणसुद्धा आता राहिली नाही. २६ जानेवारीपूर्वी प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री जाहीर झाल्याचे तुम्हाला दिसेल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात पालकमंत्री कोण होते हे कोणालाही ठावून नव्हते असे सांगून त्यांनी तत्कालीन पालकमंत्री नितीन राऊत यांना टोला गलावला. विशेष म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी १७ किंवा १८ जानेवारीला पालकमंर्त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे यापूर्वी सांगितले. आता त्यांनी २६ जानेवारीपूर्वी असे सांगितल्याने अद्यापही पालकमंर्त्यांच्या नियुक्त्यांबाबत महायुतीत एकमत होत नसल्याची चर्चा आहे असे असले तरी पालकमंत्र्यांबाबत फार जास्त वाट पहायची गरज नाही, मुख्यमंत्र्यांच्या तो अधिकार आहे ते लवकरच निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

💫ओबीसी आरक्षणावर जानेवारी अखेर निकाल ? :-

ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल येणे अपेक्षित आहे. त्यानंतर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने जाहीर होईल. दाहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बघून आम्ही राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची विनंती करणार असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या